lature sakal
मराठवाडा

Lature News : हिंदू मुस्लिम ऐक्याचे लातूर शहरात दर्शन विसर्जनामुळे ईद एक दिवस पुढे

लातूर जिल्हा ईद-ए-मीलादुन्नबी समितीची येथे बैठक झाली.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

लातूर - लातूरने सातत्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन दाखवून दिले आहे. या वर्षी देखील हे ऐक्याचे दर्शन पहायला मिळत आहे. या वर्षी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे दोनही सण ता. २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी न करता ता. २९ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी समितीने घेतला आहे.या निमित्त काढली जाणारी कौमी एकता रॅली रद्द करण्याचाही निर्णय समितीने घेतला आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

लातूर जिल्हा ईद-ए-मीलादुन्नबी समितीची येथे बैठक झाली. या बैठकीत लातूर जिल्हा ईद-ए-मिलादुन्नबी समितीच्या अध्यक्षपदी हाजी शेख नासर गफुरसाब यांची तर उपाध्यक्षपदी सय्यद महेबूब शफियोदिन काझी व शेख अरबाज अब्दुल सतार यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून अ‍ॅड. सरफराज पठाण यांची निवड करण्यात आली.

यावर्षी गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद हे ता. २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी आले आहेत.येथे गणेश विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका निघतात. रस्त्यावर गणेश भक्तांची मोठी गर्दी राहते. रात्री उशिरापर्यंत हा मिरवणुका सुरु राहतात. शहारातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून जातात. तर दुसरीकडे ईद-ए-मिलाद या सणाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून देखील विविध धार्मिक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात.

दोनही सण एकत्र आल्याने अधिकच गर्दी होवू शकते. पण हे दोनही सण उत्साहात व शांततेत पार पडावेत या करीता समितीने ता. २८ ऐवजी ता. २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे.या बैठकीत कलीम रजा कुरेशी, हाजी शफियोद्दीन, यासीन कच्छी, सरफराज मणियार, अफजल कुरेशी, रियाज कुरेशी, अय्याज पठाण, सलीम घंटे, शेख जफर नुरअली, मुस्तफा शेख, सरफराज पठाण, इम्रान गोंद्रीकर व संस्थापक सचिव उमरदराज खान आदी उपस्थित होते.

प्रशासनाच्या विनंतीला मान

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमिवर ईद-ए-मिलाद ता. २९ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय या समितीने घेतला आहे. तसेच या वर्षीची कौमी एकता मोटारसायकल रॅली रद्द करण्यात आली आहे. शहरातील शांतता व सुव्यवस्था अबादित राहण्याकरिता व सामाजिक सलोखा राखण्यास व समाजकार्यात ही समिती नेहमीच अग्रेसर असते. हेही यावेळी समितीने दाखवून दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Crime : सायबर ठगांनी पोलिस अधिकाऱ्यालाच १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट' मध्ये ठेवले; २२ लाख उकळले अन्...

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

Ashadhi Ekadashi 2025 Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासाला बनवा पौष्टिक रताळ्याचे कटलेट, सोपी आहे रेसिपी

Mobile Addiction : बाबा, गेम खेळू दे...नकार मिळताच मुलीने संपवल आयुष्य! कळंब हादरलं

मोठी बातमी! पहिल्या फेरीत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीपर्यंत थांबावे लागणार; दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यास १३ जुलैपर्यंत मुदत

SCROLL FOR NEXT