Divisional Revenue Sports And Cultural Competation Latur  
मराठवाडा

लातूरचे जिल्हाधिकारी बनले तान्हाजी, शंकरा रे शंकरा गीतावर केले नृत्य

सकाळ वृत्तसेवा

लातूर, ता.10 : प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळालेल्या "तान्हाजी' चित्रपटातील "शंकरा रे शंकरा' या गीतावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नृत्य अन्‌ चित्रपटातील संवाद सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. अशीच दाद परभणी, बीड आणि नांदेडमधील स्पर्धक कलावंतांनी या वेळी मिळवली. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.


नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात परभणी, बीड, लातूर व नांदेड या चार जिल्ह्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्याला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यास एक तासाचा वेळ देण्यात आला होता. यात लातूरच्या संघाने "गड आला; पण सिंह गेला' या थीमवर नृत्य-नाट्य सादर केले. यात जी. श्रीकांत, तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार राजेश जाधव, विलास मलिशे, अनिता ढगे, वाहिद शेख, गणेश शिनगिरे, शरण पत्री, चंद्रकांत फड, संदेश राठोड, संजय जाधव, ज्ञानेश्वर काळे, जयेश जगताप यात सहभागी झाले होते. या नृत्यातून मावळ्यांचा जोश, आवेश, शिवरायांबद्दलचा आदरही कलावंतांनी अभिनयातून सादर केला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला.


सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात रेणुका पुरी व सुप्रिया बिराजदार यांनी गणेश वंदनेने केली. नायब तहसीलदार राजाभाऊ खरात यांचे ढोलकी वादन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. तर अभिजित अवधुते यांनी "ही नवरी असली, ही मनात ठसली' हे गाणे सादर केले. अंबिका जोगदंड यांच्या लयबद्ध भरतनाट्यम नृत्याने प्रेक्षकांना मोहित केले. लातूरकर गायकांच्या दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए या समूह गायनाने देशभक्तीची ज्योत पेटवली. नायब तहसीलदार एम. देवणीकर यांच्या "जगावे की मरावे' या एकपात्री अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

माधव पांचाळ, श्रीहरी माने, रत्नाकर महामुनी व इतर कलाकारांनी नाटकातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. रेणुका पुरी, सानिया सौदागर, स्वाती गणगे, ज्योती गाढवे, अनिता निगोळे, अनुराधा विभुते, प्रणिता वरवटकर, शबाना पठाण व संगीता पाटील या कलाकारांनी राजस्थानी लोकनृत्य सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. नायब तहसीलदार वृषाली केसकर व आर. एम. देवणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT