File Photo 
मराठवाडा

स्वारातीम विद्यापीठ देतय प्राध्यापकांना ऑनलाईन प्रशिक्षणातून धडे

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘लॉकडाऊन’च्या काळात ऑनलाईनद्वारे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. सोमवारी (ता.२७) एप्रिल पासून सुरु करण्यात आलेली ही पाच दिवशीय कार्यशाळा (ता. दोन) में पर्यंत सुरु राहणार आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यशाळेस देशभरातील प्राध्यापकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. अशात प्राध्यापक, विद्यार्थी घराच्या बाहेर कसे पडतील. परंतु आधुनिक काळात प्राध्यापकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे. विद्यार्थ्यांना काळानुरुप सक्षम बनविण्यासाठी प्राध्यापकांनी नेहमी अद्ययावत असले पाहिजे. या संकल्पनेतूनच कुलगुरू डॉ. भोसले यांनी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आखला आहे. मात्र देशभरातील प्राध्यापकांची गरज ओळखून या आॅनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यापीठ परिक्षेत्रा बाहेरील प्राध्यापकांना देखील यात सामिल करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली. परिणामी सदरील आॅनलाईन कार्यशाळेत हजारो शिक्षक जोडल्या जात आहेत. अगदी तामिळनाडू, केरळपासून ते दिल्ली, हिमाचल प्रदेशपर्यंतच्या राज्यातील प्राध्यापकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

शेवटच्या दिवशी कार्यशाळेवर आधारित परीक्षा
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन प्रशिक्षणाचे महत्त्व ओळखून कुलगुरू डॉ. भोसले यांनी हे पाऊल उचलले आहे. या प्रशिक्षणा दरम्यान दररोज ठरवलेल्या विषयानुसार त्यासंबंधीचे व्हिडिओ विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतात. तसेच त्याच दिवशी सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर सक्रिय सहभाग घेऊन पास होणाऱ्या प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

कार्यशाळा घेणारे महाराष्ट्रातील पहिलेच विद्यापीठ

यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे विविध बैठकींचे यशस्वीरित्या आयोजन केलेले आहे. यामध्ये व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, प्राचार्य आणि अधिकारी इत्यादी बैठकींचा समावेश आहे. कुलगुरू  डॉ. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ नियमितपणे कार्य करण्यात अग्रेसर आहे. कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा पहिला मान महाराष्ट्रातून याच विद्यापीठास मिळाला आहे. ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेणारे हे महाराष्ट्रातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. शिक्षकांचा वाढता प्रतिसाद बघता दुसऱ्या कार्यशाळेचे लवकरच नियोजन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेंद्र रेड्डी, डॉ. रूपाली जैन, सिस्टीम एक्सपर्ट अजय दर्शनकार परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुणे आणि राज्यात 'थंडी'ची चाहूल; मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा, विदर्भ, मराठवाड्यातही पारा खाली

Uddhav Thackeray: शेतकरी उद्‌ध्वस्त, सरकारकडून विकासाच्या गप्पा: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; बार्शी तालुक्यातील घारीत शिवसेनेचा संवाद दौरा

Jalgaon Bus Accident : जळगावमध्ये ट्रॅव्हल्स बस अन् टॅंकरचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू , ७ गंभीर जखमी

Brazilian Model Larissa: मतदानातील '२२' चा मॅजिक! राहुल गांधींचा Viral Claim पाहून ब्राझिलियन मॉडेल म्हणाली, ‘ भारतात हे काय चाललंय?'

माेठी बातमी! 'मैत्रिणीचा खून केल्याचे सांगत तो पोलिस ठाण्यात हजर';मृतदेह टाकला नदीत, सांगली पाेलिस यंत्रणा हादरली

SCROLL FOR NEXT