संग्रहित चित्र. 
मराठवाडा

नाफेडच्या हरभरा खरेदीची मर्यादा प्रत्येकी २५ क्विंटलचीच 

उमेश वाघमारे

जालना, ता.१८ : यंदा हरभरा पिकाची उत्पादकता वाढलेली आहे. असे असतानाही प्रत्येकी कमाल २५ क्विंटल हरभरा खरेदीची अट नाफेडने कायम ठेवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांत थोडा दिलासा, थोडी निराशा अशी भावना आहे. 

शासनाने हरभऱ्याला चार हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. सुरवातीला हरभऱ्याची उत्पादकता हेक्टरी ६.८७ क्विंटल प्रति हेक्टरी ठरविण्यात आली होती. मात्र, ही उत्पादकता खूपच कमी असल्याने फेर उत्पादकता काढण्यात आली. आता हरभऱ्याची उत्पादकता हेक्टरी १०.५८ क्विंटल ठरविण्यात आली आहे. त्यामुळे आता नाफेडकडून हेक्टरी १०.५८ क्विंटल हरभरा खरेदी केला जाणार आहे. 

फेडकडून जिल्ह्यात तुरीपाठोपाठ हरभरा खरेदी सुरू केली आहे. नाफेडच्या सहा खरेदी केंद्रापैकी भोकरदन आणि जालना येथील खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी सुरू झाली आहे. नाफेडकडून मार्च महिन्याच्या सुरवातीला जिल्ह्यातील हरभरा उत्पादकता ही ६.८७ क्विंटल प्रति हेक्टर असल्याचे कळविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ही उत्पादकता कमी असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सुरू निघाला होता.

त्यामुळे कृषी विभागाने हेक्टरी हरभरा उत्पादकतेचे पुनर्मुल्यांकन करून सुधारित उत्पादकता कळविली. त्यानुसार नाफेडने खरेदीसाठी हरभऱ्याची उत्पादकता वाढविली असून आता हेक्टरी १०.५८ क्विंटल हरभरा नाफेड खरेदी करणार आहे.मात्र, दुसरीकडे नाफेडने हरभरा खरेदीची मर्यादा वाढविली नाही. परिणामी एका शेतकऱ्याकडून केवळ २५ क्विंटलपर्यंतच नाफेड हरभरा खरेदी करणार आहे. त्यामुळे आता नाफेडने ज्या प्रमाणात हरभऱ्याची उत्पादकता वाढली त्याच प्रमाणात हरभरा खरेदीची मर्यादा वाढविली तर या कोरोनाच्या सावटामध्ये शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे अधिकचे मिळण्याची सोय होईल. 

शासनाकडून हरभऱ्याची सुधारित उत्पादकता प्राप्त झाली आहे. त्यानुसार हरभराची उत्पादकता पूर्वीपेक्षा वाढविण्यात आली असून आता हेक्टरी १०.५८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात येणार आहे. एका शेतकऱ्याकडून २५ क्विंटलपर्यंत हरभरा खरेदीची कमाल मर्यादा आहे. 
-विमल वाघमारे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जालना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT