images 
मराठवाडा

लाइन ब्लाॅकमुळे रेल्वेच्या वेळा कोलमडल्या

राजन मंगरूळकर

नांदेड ः दक्षिण मध्ये रेल्वे विभागातील नांदेड जवळील लिंबगाव ते चुडावा या स्थानकादरम्यान लाइन ब्लाॅकच्या कामामुळे दोन दिवस ठेवण्यात आलेल्या ब्लाॅकचा परिणाम शनिवारी पहिल्या दिवशी प्रवाशांना त्रासदायक ठरला. यामुळे नांदेड ते परभणी जाणाऱ्या तर पुर्णेहुन नांदेड, मुदखेडकडे जाणाऱ्या रेल्वेच्या वेळा कोडमडल्या तर अनेक रेल्वे उशिराने धावल्या.

सध्या मुदखेड ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये सध्या लिंबगाव ते पुर्णा दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आहे. यातच लिंबगाव ते चुडावा दरम्यान नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम गतीने सुरु आहे. याच ठिकाणी दोन दिवसांचा लाइन ब्लाॅक हाती घेण्यात आला आहे. 


या रेल्वे धावल्या विलंबाने
ब्लॉकचा परिणाम दुपारी धावणाऱ्या चार गाड्यांवर झाला. ज्यामध्ये नारखेड-काचिगुडा, काचिगुडा-नारखेड, मनमाड-काचिगुडा तर काचिगुडा-नगरसोल या चार रेल्वेना पुर्णा व नांदेड येथे काही वेळेसाठी थांबविण्यात आले होते. तसेच नगरसोल ते नांदेड ही गाडी शनिवार, रविवारी परभणी ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली. शनिवारी दुपारी १.२० ला नांदेड येथे आलेली नारखेड इंटरसिटी इक्सप्रेस २.१५ वाजेपर्यंत नांदेडलाच थांबविली हाेती. ही गाडी पुर्णा येथे ३.४५ वाजता पोहचली. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. नांदेड येथे इंटरसिटी थांबविल्यामुळे काचिगुडा-नगरसोल ही पॅसेंजर मुदखेड येथे एक ते दोन पर्यंत उभी होती. यानंतर ती नांदेडला आली. परिणामी तिला परभणीपर्यंत जाण्यासाठी सायंकाळी सहा वाजले.

पुर्णेकरांची झाली गैरसोय
पुर्णा येथुन नांदेडला येणाऱ्या अनेक अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांची शनिवारी गैरसोय झाली. नरखेड-काचिगुडा इंटरसिटी निर्धारित वेळेपेक्षा १.३० तास उशिराने धावली. परिणामी पुर्णा येथुन नांदेडला येणाऱ्यांना खासगी बसने प्रवास करावा लागला.

सकाळपासूनच अनेक रेल्वे विलंबाने धावल्या
सध्या थंडी वाढल्याने व काहीसा धुक्याचा परिणाम त्यातच रेल्वेच्या विस्कळीत झालेल्या वेळापत्रकामुळे शनिवारी अनेक रेल्वे सकाळपासून विलंबाने धावल्या. यात धर्माबाद-मनमाड हायकोर्ट रेल्वे एक तास विलंबाने नांदेड येथे आली. सकाळी ६.४५ च्या दरम्यान नांदेडला आलेली रेल्वे औरंगाबाद येथे दुपारी १२ च्या सुमारास पोहचल्याने कामानिमित्त जाणाऱ्यांची गैरसोय झाली.

दुपारच्या कामाचा परिणाम रात्रीपर्यंत
लिंबगाव ते चुडावा दरम्याने दुपारी तीन तासांचा ब्लाॅक घेण्यात आल्यामुळे नांदेडहुन पुर्णेला जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेला नेहमी लागणाऱ्या वेळेपेक्षा अर्धातासाचा उशिर झाला. लाइन ब्लाॅकमुळे लिंबगाव ते चुडावा दरम्यान जास्तीचा वेळ व जागोजागी काॅशन निर्माण झाले हाेते.

दाैंड-नांदेडमुळे मेडचल रेल्वे रद्द
दौंडहून नांदेडला येणारी पॅसेंजर सध्या दररोज किमान चार ते पाच तास उशिराने धावत आहे. शनिवारी पहाटे चारला येणारी गाडी दुपारी १२.३० वाजता पुर्णेपर्यंत आली होती. लाईन ब्लाॅकमुुळे ही गाडी पुर्णा ते नांदेड रद्द करण्यात आली. परिणामी याच गाडीचा रेक नांदेड-मेडचलला वापरला जातो. मात्र, नांदेडहुन मेडचलची रेल्वे शनिवारी रद्द करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT