lizard in water bottle sakal
मराठवाडा

Lizard : पाण्याच्या बाटलीत आढळली पाल; नर्सिंगच्या चौघींना चक्कर, उलटीचा त्रास

जालना परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथे गुरूवारी (ता.आठ) पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत पाल आढळली.

सकाळ वृत्तसेवा

जालना - जालना परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथे गुरूवारी (ता.आठ) पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत पाल आढळली. त्यातच या प्रकारानंतर नर्सिंगच्या चार विद्यार्थिनींना चक्कर आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. या चौघींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथे गुरूवारी (ता.आठ) पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाल आढळून आली. पाण्याच्या बाटली पाल असल्याची माहिती पडताच येथील तीन विद्यार्थिंनींना मळमळ, उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. ही माहिती परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी त्यांनी तत्काळ या विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या चार  विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण केंद्रात पाण्याच्या बाटलीमध्ये पाल आढळून आल्यानंतर चार विद्यार्थिनींना उलटी, चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. त्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT