file photo 
मराठवाडा

नागरिकांच्या सहकार्यानेच लॉकडाऊनची मोहीम यशस्वी, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी 

राजेश दारव्हेकर

 हिंगोली :  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौदा दिवसाच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी,  लॉकडाउन  लागु करण्यात आली होती . याची अंमलबजावणी योग्य प्रमाणे झाली सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी बुधवार ता. १९ नागरिकांचे पत्रकार परिषद घेऊन आभार मानले आहेत.

लाँकडाऊन काळात जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वकल्पना देण्यात आली होती . या कालावधीत दुध , औषध व कृषी विषयक सेवांना मर्यादीत कालावधीसाठी सवलत देण्यात आली होती . या व्यतीरिक्त कोणत्याही व्यवसायास सवलत देण्यात आली नसतांना देखील लॉकडाऊन सक्तीने करण्याची आवश्यकता भासली नाही . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सुजाण जनता , व्यावसायिक , सामाजिक संस्था , पदाधिकारी , लोकप्रतिनिधी , पत्रकार यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत आदेशाचे पालन करुन लाकडाऊनची मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याने जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

जिल्ह्यातील व्यावसायीकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम घेण्यात नाली

तसेच आरोग्य , पोलीस , नगरपालीका , स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्व शासकीय यंत्रणानी देखील लॉकडाऊनच्या कालावधीत त्यांचे कर्तव्य चोख पार पाडल्याबद्दल त्यांचे देखील जिल्हाधिकारी श्री।  जयवंशी यांनी आभार व्यक्त केले आहेत . या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील व्यावसायीकांची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्याची मोहीम घेण्यात नाली होती . त्यामध्ये देखील व्यावसायीकांनी तपासणी करुन घेऊन प्रशासनास मोठ्या प्रमाणात सहकार्य केले . तसेच आवेळी तांत्रिक अडचणीमुळे काही व्यावसायीकांचे रैपीड अँटीजन टेस्ट करणे राहीले असल्याने त्यांचे लाकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर तीन दिवसाच्या आत रपीड अँटीजन टेस्ट करुन घेण्याच्या अटीवर गुरुवारपासून ता. २० प्रतीष्ठाने,  दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येत आहे . आगामी कालावधी हा सण , उत्सवाचा कालावधी असल्याने सर्व व्यावसायीकांना आपली प्रतीष्ठाने,  दूकाने गुरुवारपासुन  सकाळी नऊ वाजेपासुन ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच उघडे ठेवता येणार आहेत . 

सोशल डिस्टंसीगचे पालन होईल व मध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी

यावेळी प्रतिष्ठाने  दुकाने उघडत असतांना संपुर्ण दूकानाचे सॅनिटायजेशन करुनच उघडावीत . तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या दर्शक सूचनानुसार दूकानामध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांचे पल्स ऑक्सीमीटरद्वारे ऑक्सीजन , थर्मलगनद्वारे ताप तपासणी  प्रत्येक ग्राहकांची आपल्या प्रतीष्ठाने,  दूकानातील नोंदवहीमध्ये नोंद करावी , तसेच दुकानाबाहेर ग्राहकांना यासाठी गोल,  चौकोनाची आखणी करुन ग्राहकांना त्यामध्ये उभे करुन सोशल डिस्टंसीगचे पालन होईल व मध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी वरील नियामांचे पालन करुन स्वतः सह इतरांच्याही आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

TRAI SMS Codes : SMS च्या शेवटी P, G, T, S अक्षरांचा अर्थ काय? आत्ताच समजून घ्या नाहीतर होईल हजारो रुपायांची फसवणूक

US Plane: मोठा अपघात! कॅनडा एक्सप्रेस विमानाला अग्निशमन दलाच्या ट्रकची जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक प्रवासी जखमी

Parbhani News: परभणीत कचऱ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर; दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; डेपोतील प्रक्रिया कधी बंद तर कधी सुरू

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

SCROLL FOR NEXT