nanded news 
मराठवाडा

Video-लॉकडाउन : नागरिकांचे प्रयत्न आले फळाला, कसे? ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी

नांदेड : म्हाडा काॅलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी लाॅकडाउनच्या वेळेचा सदुपयोग केला. त्यांनी या काळात श्रमदान करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कोणत्याही प्रयत्नात सातत्य असेल तर यश मिळतेच, हे या नागरिकांनी सिद्ध करून दाखवले असून इतरांनीही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून घेणे निश्चितच फलदायी ठरणारी आहे.

म्हाडा कॉलनीतील काही नागरिकांनी पुढाकार घेऊन महापालिकेकडून २००५ मध्ये श्री गुरुनानकदेवजी बालोद्यानची उभारणी केली. सुरुवातीचे एक-दोन वर्षे त्याची देखभाल झाली. त्यानंतरच्या काळात मात्र हे उद्यान बंद पडले. त्यामुळे उद्यानातील धुळीने तसेच कचऱ्याने माखलेला पदपथ, वाळलेली झाडे आदींमुळे येथील नागरिक उद्यानात जाण्यासाठी घाबरत होते. परिणामी बालगोपालांना हुंदडायला तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून या उद्यानाचा वापर होत नव्हता. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन केला. त्यामुळे सर्वचजण घरामध्येच आहे.   

नागरिकांच्या पुढाकारातून श्री गुरुनानकदेवजी बालोद्यानाच्या सुशोभीकरणाला सुरुवात करण्यात आल्याने अनेक वर्षे बंद पडलेले हे उद्यान बच्चे कंपनीसह ज्येष्ठ नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. म्हाडा काॅलनीतील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून तसेच बच्चे कंपनीला खेळण्यासाठी हक्काची जागा लॉकडाउनचा सदुपयोग केल्याने उपलब्ध झाली आहे. या उद्यानाकडे महापालिका प्रशासनाला देखभालीसाठी वेळ मिळ नाही, हे दुर्दैव आहे. उद्यानातील स्ट्रीट लाईट्सही कित्येक वर्षांपासून बंद असून, सुरु करण्याबाबत अनेकदा मागणी केलेली आहे. आताही केली आहे. परंतु, अधिकारी लक्ष द्यायला तयार नाहीत, अशी खंत या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

हे देखील वाचायलाच पाहिजेमुख्यमंत्री म्हणाले, ‘शारीरिक अंतर’ हा शब्द वापरू : ‘सकाळ’मधील बातमीची दखल
 
महापालिकेने म्हाडा काॅलनीत एका मोठ्या नाल्यावर उद्यानाची स्थापना केली. परंतु, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गवतांनी हे उद्यान झाकून गेले होते. परिणामी बंदावस्थेतच होते.  उद्यानातील ट्रॅक पूर्णतः गवतांनी झाकून गेल्याने उद्यानात पाय ठेवणेही धोकादायक झाले होते. देखभालच होत नसल्याने झाडी पूर्णतः वाळून गेली होती. उद्यानात बोअर आहे, परंतु मोटर बंदावस्थेत होती. ही मोटारही नागरिकांनी दुरुस्त करून घेतल्याने दररोज झाडांना पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्यानात चोहीकडे हिरवळ बघायला मिळत आहे. 

उद्यानात या झाडांची केली लागवड
आयजी कार्यालयाच्या मागच्या बाजूला म्हाडा कॉलनी ही वसाहत आहे. तेथे बालोद्यान असून, त्यात नागरिकांच्या पुढाकारातून आवळा, सैतुक, तैवानी थांब, हापूस आंबा, शेवगा, फुलझाडे, तुळशीचे पत्रकार, चंदन, सागवान, चिमनसाग, चाफा, वड, बेल, ऑलविरासह इतर आयुर्वेद वनस्पती लावलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandara Accident: भंडाऱ्यात भीषण अपघात! भरधाव ट्रेलरची एसटी बसला जोरदार धडक; चालक-वाहकासह सात जण जखमी

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन तीव्र; १८ जुलैला पंढरपुरात शेतकऱ्यांची 'सद्बुद्धी यात्रा'

Kolhapur Accident: हृदयद्रावक! कागलमध्ये जुने घर कोसळले; आईचा मृत्यू, शेजारी बसलेला १४ वर्षीय मुलगा बचावला

Maharashtra Rain Update : राज्यात पाऊस ओसरला, मॉन्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

Pimpri Garbage: ‘बफर झोन’ पायदळी, आदेश धाब्यावर; डेपोपासून ३० मीटरवर इमारत बांधण्याचा पिंपरी महापालिकेचा निर्णय वादात

SCROLL FOR NEXT