file photo
file photo 
मराठवाडा

लॉकडाउन : महावितरण, 'मिस कॉल' व 'एसएमएस' वरुन नोंदवा तक्रार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता 'मिस कॉल' व 'एसएमएस' करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नांदेड परिमंडळातील जास्तीत- जास्त वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे व डिजिटल माध्यमातून वीजबिल भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.

नोंदणीकृत मोबाइलऐवजी इतर क्रमांकावरून ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर 'मिस कॉल' दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा 'एसएमएस' पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर MREG टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवावा. या एका 'एसएमएस'द्वारे तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अँप अथवा १८००-२३३-३४३५, १८००-१०२-३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो. 

तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल.

याशिवाय NOPOWER टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन १२ अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस' पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल. स्वयंचलीत प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अँप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.

भार टाळण्यासाठी वीजबिल ऑनलाईन भरा

घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरीही एकाच वेळी येणारा अतिभार टाळण्यासाठी कल्याण परिमंडलातील वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरून गैरसोय टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता पडळकर यांनी केले आहे. www.mahadiscom.in या वेबसाईटवरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे ग्राहकांसाठीचे मोबाईल अँप, विविध पेमेंट अँपचा उपयोग करून सुलभ व सुरक्षितपणे वीजबिलाचा भरणा शक्य आहे. स्थिर आकारातील सवलत केवळ व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यामुळे गैरसमज न ठेवता घरगुती ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून करावा, असे आवाहन करण्यात महावितरणकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT