latur news 
मराठवाडा

Video : शांततेच्या सुरात हरखून जातायत प्राणी-पक्षी

सुशांत सांगवे

लातूर : माणसांची वर्दळ पूर्णपणे कमी झाली आहे. रस्त्यावरील वाहनांचे कर्नककृश आवाज बंद झाले आहेत. त्यामुळे गोंगाट नाहीसा झाला आहे. सगळीकडे शांततेचे सूर अनुभवायला मिळत आहेत. या सुरात हरवून जात अनेक प्रकारचे पशु-पक्षी शहर परिसरात मुक्त विहार करू लागले आहेत. नेहमी दबकून राहणारे, लपून-छपून हालचाल करणारे प्राणीही सर्रास पहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांसाठी ‘लॉकडाऊन’ आनंददायी ठरत आहे.

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या वतीने वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. लोकांनी गर्दी करू नये म्हणून किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. धूर सोडणारे कारखाने, वाहने बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी खालावण्याबरोबरच गोंगाटाची आलेखही कमी झाला आहे. माणसे घरात बसून आहेत.

या सर्व बाबींचा परिणाम पशू-पक्षांच्या जीवनावर झाला आहे. वनक्षेत्राबरोबरच ते मनुष्यवस्तीत मुक्त विहार करत आहेत. याच्या नानाविध विलोभनिय मुद्रा लातूरातील वन्यजीव छायाचित्रकार एम. एम. कोंपलवार (वन परिमंडळ अधिकारी), धनंजय गुत्ते, राहुल जवळगे, हेमंत रामढवे यांनी आपल्या कॅमेरात टिपल्या आहेत.

कोंपलवार म्हणाले, संचारबंदी लागू होण्याआधी आपल्याला बरेच पशू-पक्षी पहायला मिळत होते. पण, संचारबंदी लागू झाल्यानंतर हे प्रमाण चांगलेच वाढलेले आहे. कारण एकीकडे माणसांचा, वाहनांचा वावर कमी झाला आहे.

दुसरीकडे प्रदुषण कमी झाले आहे. पूर्वी कोल्हा आणि इतर काही प्राणी हमखास संध्याकाळी पहायला मिळत होते. तेच प्राणी आता सकाळी किंवा दुपारीही पहायला मिळत आहेत. काळवीट, ससा, घोरपड, मोर हे लपून-छपुन वावरणारे प्राणी मुक्तपणे फिरू लागले आहेत. वनक्षेत्राबाहेर संचार करू लागली आहेत.

जवळगे म्हणाले, संचारबंदी असल्यामुळे घरी बसून मला विविध पक्षांची छायाचित्रे काढण्याची अनोखी संधी मिळाली. साळुंकी, कोकिळा, चिमणी, राखी वटवट्या, शिंपी हे पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. याबरोबरच सहसा कधी न येणारे, सहज न दिसणारे शिक्रा, स्वर्गीय नर्तक, कवडी रामगंगा हे पक्षीही आता अंगणात दिसत आहेत. या पक्षांचे मंजुळ स्वर सध्या लातूरकरांना घरबसल्या अनुभवायला मिळत आहेत.

उद्यासाठी ‘हा’ धोका

संचारबंदीमुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. फारशी वाहने रस्त्यावर नाहीत. त्यामुळे पशू-पक्षी रस्त्यावर येत आहेत. मनुष्यवस्तीत बिनधास्त फिरत आहेत. काही दिवसांनी संचारबंदी मागे घेतल्यानंतर पून्हा वाहने रस्त्यावर उतरतील. त्यावेळी पशू-पक्षांचे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. याचाही विचार झाला पाहीजे, अशी चिंता हेमंत रामढवे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT