Nanded News 
मराठवाडा

लॉकडाउन : भुकेल्यांच्या मदतीला ग्यानमाता आली धावून

प्रमोद चौधरी

नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबांचे तसेच गरीबांचे मोठे हाल होत आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था, शासनाच्या वतीने त्यांना मदत दिली जात आहे. परंतु, ती तोकडी पडत असल्याने अनेकजण भुकेलेच रहात आहेत. त्यांच्या मदतीसाठी ग्यानमाता शाळेचे कर्मचारी धावून आले आहेत.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने तो लॉकडाउन सुरू केला आहे.  त्यात सर्वात जास्त अडचण गरीब व हातावर पोट असलेल्या कुटुंबाची होत आहे. त्यांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सेवाभावी संस्था कार्य करीत आहेत. आपल्या जवळची अर्धी भाकर दुसऱ्यांना देणारी भारतीय संस्कृती खऱ्या रूपाने लॉकडाउनमध्ये पावलोपावली दिसून येत आहे. नांदेड येथील इंग्रजी माध्यमाची शाळा ग्यानमाता विद्याविहारने ही भारतीय संस्कृतीची जोपासना करत ‘ग्यान माता सेवाभावी स्वयंपाक’ हा उपक्रम सुरू केला आहे. 

‘ग्यान माता सेवाभावी स्वयंपाक’ या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज भुकेल्यांना दोन वेळचे अन्नदान केले जात आहे. शिवाय विद्याविहारच्या वतीने पाच लाख रुपये पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीलाही दिले आहेत. असंख्य बाहेरगावच्या व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी नांदेडमध्ये आले होते. दरम्यान यातील अनेकजण लॉकडाउनमध्ये अडकले आहेत.  त्यांच्या जेवणाची व्यवस्था ग्यानमाता विद्याविहार शाळेने केली आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या उपक्रमास शाळेचे व्यवस्थापक, शिक्षक, पालक, कर्मचारी यांचा पुढाकार आहे.   

‘परोपकार करना, दुसरों की सेवा करना, और उसमें जरा भी अहम, अहंकार न करना, यही सच्ची शिक्षा है ।’’ त्यामुळे कोरोनाच्या महामारीच्या संकटाच्या वेळी अन्नदानाचे महान कार्य ग्यानमाता विद्याविहारने उचलल्याचे प्राचार्य फादर शिजूमोन, उपप्राचार्य फादर अरुण, व्यवस्थापक फादर सिल्वेबेस्ट यांनीसांगितले.  

नुसते ज्ञानाचे धडे देउन जीवन जगता येत नाही. त्यासाठी संस्कार आणि संस्कृती आत्मसात करण्याची गरज असते. आपल्या विद्यार्थांना अशा उपक्रमातून प्रेरणा मिळावी म्हणून हा यामागील उद्देश असल्याचेही प्राचार्य फादर शिजूमोन यांनी स्पष्ट केले. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने घरीच सुरक्षित राहून स्वतःची, कुटुंबाची काळजी घेण्याचेही आवाहन ग्यानमाता विद्याविहारच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Wari Accident : जेजुरी अपघातातील जखमी वारकऱ्यांची सुनेत्रा पवार यांच्याकडून विचारपूस, अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

'तू मला रडवलंस...' जेनिलिया देशमुखने राम कपूर संदर्भात व्यक्त होत म्हणाली...

Vinayak Raut Case: शारीरिक छळ अन् मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी अघोरी उपचार; राऊत कुटुंबियांविरोधात सुनेची तक्रार

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Instagram यूजर्ससाठी धोक्याची घंटा! 'ही' सेटिंग बंद न केल्यास Meta AI वापरू शकतो तुमचे पर्सनल फोटो, कसं बंद करायचं पाहा

SCROLL FOR NEXT