mudhkhed.jpg 
मराठवाडा

‘लॉकडाऊन’चा वाळू माफीयांनी उचलला गैरफायदा

गंगाधर डांगे


मुदखेड, (जि.नांदेड) ः तालुक्यात वाळु माफीयांनी आपला मोर्चा सक्रीय केला असून या माफीयांना कोरोनाच्या गंभीर परीस्थीतीचे ही काही घेणं देणं नसल्याचा गंभीर प्रकार नुकताच मुदखेडमध्ये समोर आला आहे. गुरूवारी (ता.२६) रोजी महसुलच्या नांदेड व मुदखेड विभागाच्या संयुक्त पथकाने मुगट (ता. मुदखेड) हद्दीतील बॅक वाटर नाल्यात लपून ठेवण्यात आलेले तिन बोटी जिलेटीनद्वारे उडवून देऊन नष्ट करण्यात आल्या.


बोटी शोधून केली कारवाई 
सदर बोटीने नांदेड व मुदखेड तालुक्याच्या हद्दीतील वाळूचे उत्खनन करीत होते व मुगट हद्दीतील अगदी अवघड ठिकाणी नाल्यात या बोटी लपवून ठेवल्या जात असल्याची माहीती या पथकास मिळाल्याने या संयुक्त पथकाने या बोटी शोधून कारवाई केली. मुदखेड व नांदेड तालुक्याची सिमा रेषा ही गोदावरी व आसना नदिने रेखाटलेली असून सध्या महसुल विभागाने या नदीमध्ये पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर असल्याने वाळू घाट लिलावात काढले नाहीत. परिणामी सर्वत्र वाळूचा मोठा तुटवडा असल्याने वाळूची मोठी मागणी वाढलेली आहे. तर दुसरीकडे या दोन तालुक्यात जिल्ह्यातील मोठ मोठे वाळू माफीया बस्तान मांडून आहेत.

गोदापात्रात मोठा धुमाकुळ
जिल्हाधीकारी यांनी वाळू माफीयांच्या मुसक्या चांगल्याच आवळल्याचे दिसून आले, परंतु मागील १५ दिवसांपासुन कोरोना या व्हायरसने धुमाकुळ घातला असून या व्हायरसशी दोन हात करण्यात प्रशासन लागलेले असतानाच या भागातील वाळू माफीये सक्रीय झालेले पहावयास मिळत आहेत. मुदखेड तालुक्यातील शंखतीर्थ, देवापुर, वासरी, आमदुरा, मुगट, ब्राम्हणवाडा या गावच्या वाळुपट्यात या माफीयांनी गोदापात्रात मोठा धुमाकुळ घातलेला पहावयास मिळत आहे. प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त कामात व्यस्त असताना हे वाळू माफीया रात्री १२ च्या नंतर सकाळी ५ वाजेपर्यंत वाळूपट्यात सक्शन पंपद्वारे युद्ध पातळीवर कार्यरत राहुण वाळू उपसा करीत असल्याचे दिसुन येत आहे.

हेही वाचा - ​पोलिसांच्या अनोख्या कारवाईने नागरिक हिरमुसले
नांदेड व मुदखेडच्या हद्दीत हा वाळू उपसा बोटींग वरिल सक्शन पंपद्वारे होत असल्याची माहीती प्रशासनास मिळाली होती. या बोटींग दिवसाला नदी काठच्या बॅक वाटरच्या खाडीमध्ये लपवून ठेवल्याची माहितीही मिळाली. त्या वरून नांदेडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, मुदखेडचे तहसिलदार दिनेश झांपले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मुगाजी काकडे, संजय नागमवाड, मंडळ अधिकारी नागरवाड, पठाण, जोंधळे, नांदेडकर, कुऱ्हाडे, तलाठी बोधगिरे, सुर्यवंशी, राहुल, कांबळे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी गोदापात्रात जाऊन तिन बोट व सक्शन पंप जप्त करून त्यांच्यावर कार्यवाही केली. वाळु माफीयांनी सध्या देशात असलेल्या परिस्थीतीचे भान ठेवावे, त्यांनी हा प्रकार न थांबवल्यास जिल्हाधीकाऱ्यांची परवानगी घेऊन मोक्का सारख्या कायदयान्वये कारवाई करण्यात येईल असा ईशारा मुदखेडचे नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

'10 वर्ष सिद्धार्थ माझ्याशी बोललाच नाही' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितलं भांडणाचं कारण, म्हणाली..'कोणाच्या जाण्याची वाट बघू नये...'

Ratnagiri ZP : सभापती निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर; अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलली

SCROLL FOR NEXT