मराठवाडा

Lohara Accident: देवी दर्शनाला जातांना टमटम व कारचा अपघातात; दोन ठार

Dharashiv Latest News: उपचार घेत असलेल्या जखमी रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधीर कोरे

जेवळी (ता. लोहारा) येथील महिला चिवरी येथे देवी दर्शनाला जात असताना मंगळवारी (ता.८) नळदुर्ग येथे टमटम रिक्षा व कारचा अपघात झाला होता. या अपघातातील जखमी झालेल्या आणखीन एक महिलेचा शनिवारी (ता.१२) सोलापूर येथील रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू झाल्याचे आकडा आता दोन झाली आहे.

याबाबत माहिती अशी की जेवळी (ता. लोहारा) येथील महिला नवरात्र उत्सवानिमित्त चिवरी (ता. तुळजापूर) येथील देवीच्या दर्शनासाठी टमटम रिक्षाने (एम.एच. २५ एम ६७६) जात होते. राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तुळजापूर येथून देवदर्शन उरकून कर्नाटक येथील बिदरकडे जाणाऱ्या भरदा कारला (के. ए. ०३ एम. आर ०४४१) जोरदार धडक बसली.

या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात सोजरबाई तिप्पणा कोराळे (वय ७२), यांचं जागीच मृत्यू झाला होता तर या अपघातात गौराबाई सूर्यकांत साखरे (वय ६५), विमल प्रकाश साखरे (वय ५२) सरिता मल्लिनाथ हावळे (वय ४०), मंगल बाबुराव साखरे (वय ५५), सुधाबाई सोमनाथ माशाळे (वय ५०), सुमनबाई दत्तात्रय हावळे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले होते यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले होते.

या व्यतिरिक्त रिक्षा व कार मधील एकूण आठ महिलाही किरकोळ जखमी झाल्या होत्या. यांना नळदुर्ग येथेच उपचारानंतर गावी पाठवून दिले होते. गंभीर जखमी झाल्या पैकी विमल प्रकाश साखरे (वय ५२) हे गेल्या पाच दिवसापासून मृत्यूची झुऊ देत होते.

शेवटी शनिवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेली संख्या आता दोन झाली आहे. इतर सोलापूर येथे उपचार घेत असलेल्या जखमी रुग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT