file photo 
मराठवाडा

परभणीत सर्वांत निचांकी तापमानाची नोंद, परभणी @ 5.6 अंश सेल्सिअस

गणेश पांडे

परभणी ः परभणी जिल्ह्यात थंडीचा जोर परत एकदा वाढला असून सोमवारी (ता. 21) या मोसमातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी शहरासह जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 5. 6 अंशापर्यत घसरला. राज्यात ही सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

गेल्या काही वर्षापासून परभणीचे तापमान राज्यात सर्वात कमी नोंदले जात आहे. दरवर्षी डिसेंबर महिण्यात थंडीचा जोर वाढलेला असतो. यंदा परभणीच्या थंडीने महाबळेश्वर व निफाड (जि.नाशिक) लाही मागे टाकले आहे. मागील काही  दिवसापासून परभणी शहरात कमालीची थंडी पडत आहे. संपूर्ण जिल्ह्यात हुडहुडी भरत आहे. उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम म्हणून आणखी चार दिवस थंडीचा कडाका काम राहणार असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठीतील ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने दिली आहे. रविवारी (ता.20) परभणीचे तापमान सात अंश होते. तर महाबळेश्वरला 13 तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी तर परभणीने उच्चांक करत 5.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे 12 व निफाड येथे आठ अंश तापमान होते.

यापूर्वी देखील 2018 मध्ये परभणीचा पारा तीन अंशावर आला होता. तसेच 29 ते 31 डिसेंबर 2018 या तीन दिवस विक्रमी अशा तीन अंश तापमानाची नोंद परभणीत झाली होती. दरम्यान, थंडीचा जोर वाढल्याने जागो जागी रात्रीच्यावेळी शेकोट्या पेटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रात्रीच्यावेळी रस्ते निर्मनुष्य दिसत असून रात्री नऊ वाजताच प्रत्येकजन आप - आपल्या घरात गेल्याचे चित्र सध्या परभणी शहरात दिसत आहे. शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना तर थंडीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच शेतीची कामे सुरु असल्याने थंडीचा जोर असतांनाही शेतकऱ्यांना थंडीचा कडाका सहन करीत कामे करावी लागत आहे.

जसा हिवाळा तसाच उन्हाळाही

ज्या पध्दतीने परभणी जिल्हयात थंडी पडते तेवढाच उन्हाळ्यात सूर्य ही कोपतो. परभणीकरासाठी हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू विक्रमी असतात. उन्हाळ्यात 47 अंशावर पारा चढतो. आणि हिवाळ्यात पारा दोन अंशावर खाली येतो. त्यामुळे जसी हिवाळ्याती थंडीची मजा परभणीकर लुटतात तशीच उन्हामुळे ही या जिल्ह्यातील रहिवाश्यांची त्रेधा तिरपिट उडत असते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT