pm modi 
मराठवाडा

गॅस दरवाढीविरुध्द अनोखं आंदोलन; नववधूच्या हातच्या भाकरी पंतप्रधान मोदींना पार्सल

सकाळ ऑनलाईन टीम

उस्मानाबाद: गॅस दरवाढीचा फटका सर्वांना बसताना दिसत आहे. देशात ठिकठिकाणी या दरवाढीविरुध्द आंदोलने होताना दिसतात. पण उस्मानाबाद जिल्ह्यात गॅस दरवाढीविरुध्द एका अनोख्या प्रकारे आंदोलन केले आहे. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गावर केले आहे.

यामध्ये नववधूच्या हस्ते चूल पेटवून गॅस पेटवून गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेध नोंदविला आहे. एवढ्यावरच न थांबता चुलीवर भाजलेल्या भाकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या आहेत.

हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन महिला कार्यकर्त्यांनी सोलापूर-धूळे (211) राष्ट्रीय महामार्गावर केलं. यामध्ये महामार्गावर नववधूच्या हस्ते चूल पेटवून त्यावर भाकरी भाजण्यात आल्या. केंद्राने तातडीने दरवाढ मागे घ्यावी नाहीतर राष्ट्रवादी जिल्हा महिला आघाडीच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.

या आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा मनीषा पाटील, संगीता फाटक, अंजली जाधव, रोहन गव्हाणे, कृष्णा पाटील, सईद काझी आदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'झिम्बाब्वेकडून ICC स्पर्धेत हरणं म्हणजे...', ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर गेल्यावर रिकी पाँटिंग काय म्हणाला?

Uttar Pradesh Education : शाळांमध्ये धडकणार सरकारी पथकं! योगी सरकारचा मोठा प्लॅन; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतला 'हा' मोठा निर्णय

Horoscope : आज दोन शक्तिशाली राजयोगांच्या संयोगामुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; अडचणी दूर अन् लक्ष्मी घरात भरेल पाणी

Back Pain Relief : पाठ व कंबरदुखी !

ढिंग टांग : गलगोटिया पाळा, अज्ञान टाळा..!

SCROLL FOR NEXT