porkhel 
मराठवाडा

तरुण पिढीच्या वाढत्या आत्महत्येवर ‘या’ युवकाने बनविला ‘लघुपट’

राजेश दारव्हेकर

हिंगोली ः हिंगोली तालुक्‍यातील काळकोंडी येथील विजय जाधव याने निर्मित केलेला ‘पोरखेळ’ नावाचा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून तो नाशिक येथे तयार करण्यात आला आहे. तरुण पिढीच्या वाढत्या आत्महत्येवर प्रकाश टाकणारा हा लघुपट आहे.

हिंगोली तालुक्‍यातील काळकोंडी येथील विजय जाधव हा तरुण शिक्षणासाठी नाशिक येथे गेला. तेथे त्‍याने एमकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्‍याला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नृत्य करणे, अभियन करण्याच छंद होता. त्‍याच्यातील ही कलावंत त्‍याला स्‍वस्‍त बसू देत नव्हती. त्‍याने लघुपट तयार करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्‍याने मित्राच्या मदतीने नाशिक येथेच ‘घुमसट’ नावाची लघू फिल्‍म तयार केली. त्‍यानंतर त्‍याने सुनील नागमोती यांच्या मदतीने लघुपट तयार करण्याचा निर्णय घेतला.

या गोष्टी मांडल्या लघुपटात 
तरुणांवर लघुपट तयार करण्याचा विचार या दोघांनी करून आत्महत्येवर प्रकाशझोत टाकणारा हा लघुपट करण्याचे निश्चित केले. जाणत्या अजाणत्या वयात तरुण पिढीच्या हातून बऱ्याच चुका घडत असतात आणि त्याचे परिणाम स्वतःला व आई-वडिलांना भोगावे लागतात. क्षुल्लक कारणांवरून आजकाल तरुण पिढी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेते व आई-वडिलांना आयुष्यभरासाठी दुःख व सामाजिक मानहानी देते. हवीहवीशी वाटणारी गोष्ट मिळविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून जीवन संपविण्याचा घेतलेल्या दुर्दैवी निर्णयामुळे फक्त स्वतःच नव्हे तर कुटुंबाचेदेखील नुकसान होते. 

यू ट्युबवर टीजर प्रदर्शित
आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय कोणीही घेऊ नये, असा संदेश देणारा ‘पोरखेळ-खेळ दोन जिवांचा’ या नावाने लघुपट तयार करण्याचे ठरिवले. त्‍याप्रमाणे हा लघुपट रामशेज प्रोडक्शन निर्मित ‘पोरखेळ-खेळ दोन जिवांचा’ या लघुपटाचा टीजर नुकताच यू ट्युबवर प्रदर्शित केला आहे. या लघुपटाचे निर्माते विजय जाधव व सुनील नागमोती हे आहेत.

यांनी साकरल्या भूमिका 
कथा व संकल्पना विजय जाधव यांची असून दिग्दर्शनदेखील श्री. जाधव व अतुल महानवर यांनी केले आहे. तसेच लेखक योगेश गोसावी तसेच किरण मोरे, दत्ता शिंदे यांचेदेखील सहकार्य लाभले आहे. या लघुपटामध्ये मोनाली कुटे, स्वप्नील आडके, भगवान देवकर, कीर्ती नागरे, सुनील नागमोती, हरिष शेळके, शुभम पवार, अनिता पाटील, राजेंद्र काळे, रशिद शेख, योगेश जगताप, माया खर्डे, समाधान शेलार, स्नेहा पाडेवार यांनी भूमिका केली आहे. या लघुपटाचा टीजर ‘पोरखेळ-खेळ दोन जिवांचा’ हे नाव यू ट्युबवर सर्च करून पाहता येणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

 


मित्राच्या सहकार्याने केला लघुपट
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नृत्‍य व अभिनयात अनेक पुरस्‍कार मिळविले आहेत. त्‍यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर मनात असलेला कलावंत जागा झाला व लघुपट तयार करण्याची कल्‍पना आली व मित्राच्या सहकार्याने ते काम सुरू केले आहे. आता लवकर ‘पोरखेळ’ हा लघुपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. - विजय जाधव, लघुपट निर्माते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : महायुतीचा जागावाटापाच तिढा सुटला, १७ जागांसाठीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित, कुणाच्या वाट्याला किती जागा?

IPL 2026, RCB vs GT Final: टॉस हरूनही शुभमन गिल म्हणतोय, मनासारखंच झालं! फायनलसाठी कशी आहे Playing XI

Eknath Shinde: बीएमसीपासून विधान परिषदपर्यंत भाजपकडून धक्के... एकनाथ शिंदेंनी सुरू केली मोठी तयारी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चुरस

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! रजत पाटिदारने जिंकला टॉस

Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

SCROLL FOR NEXT