latur  latur
मराठवाडा

कृषी दिन विशेष: दोडके, काकडी, झेंडू फुलातून १५ लाखांचे उत्पन्न

साडेतीन एकरमध्ये वरणा शेंगा लागवड

विवेक पोतदार

जळकोट (लातूर): कितीही अडचणी आल्या तरी कोणतेही काम, जिद्द चिकाटी व आवडीने केल्यास त्यात यश मिळतेच. हे कष्टातून पारंपारिक शेतीला फाटा देत भाजीपाला लागवड करत यशाचा मार्ग उमरगा रेतू (ता. जळकोट) येथील शेतकरी श्रीराम रघुनाथ ढोबळे यांनी दाखवून दिला आहे. पारंपारिक शेतीला छेद देत उमरगा रेतू येथील शेतकरी श्रीराम ढोबळे साडेआठ एकर शेतीत नेहमी नावीन्यपूर्ण प्रयोग राबवितात. गतवर्षी कोरोना काळात सर्वजण अडचणीत असताना त्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेत १५ लाखांचे उत्पन्न मिळवले.

कोरोनाचे संकट नसते तर उत्पन्न दुप्पट वाढले असते असे त्यांनी सांगितले. कमी जमीन क्षेत्र असूनही एवढे विक्रमी उत्पादन घेणारा हा शेतकरी इतरांसाठी अनुकरणीय ठरला आहे. यंदा श्री. ढोबळे यांनी साडेतीन एकरमध्ये वरणा शेंग (आवरा) लागवड केली असून, येत्या आठवड्यात तोडा सुरु होणार आहे. यासाठी स्थानिक बाजारपेठेशिवाय हैदराबाद, निजामाबाद, पुणे येथील मार्केट असल्याचे ते म्हणाले. यातून १० लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

तर दीड एकरात शिमला मिरचीची नुकतीच लागवड केली असून, इतर अडीच एकरमध्ये टोमॅटो लागवड केली आहे. सध्या टोमॅटो फुलोऱ्यात आहेत. यातून एकूण त्यांना १९ लाखांचे अपेक्षित उत्पन्न आहे. तसेच शेतीला जोड म्हणून सुरू केलेल्या मत्स्यपालनातूनही त्यांना ४० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. श्री. ढोबळे शेतात राबवीत असलेल्या प्रयोगाला अनेक शेतकरी भेटी देतात.

कृषी विभाग व आत्माअंतर्गत मल्चिंग व बेड पद्धत तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. श्री. ढोबळे प्रयोगशील शेतकरी आहेत. विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीसाठी प्रयत्नशील आहोत. तसेच मत्स्यबीज देऊन शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित केले.
-अभिलाष क्षीरसागर, तालुका तंत्रव्यवस्थापक (आत्मा) जळकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: लाइव्ह शो, स्पोर्ट्स आणि इव्हेंट्सचे नवे ठिकाण... नवी मुंबई देशाचं एंटरटेनमेंट हब बनणार! सिडकोचा भव्य एरिना प्रकल्प काय आहे?

MPSC Exam Postponed : MPSC ची २१ डिसेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांमुळे निर्णय

मुलं न होऊ देण्याचा निर्णय चुकला नाही... लोकप्रिय अभिनेत्रीचं स्पष्ट मत; यावर पर्ण पेठे म्हणाली- माझ्या वयात...

Latest Marathi News Update : MPSC परीक्षा पुढे ढकलली

ZP Exam Controversy : उच्च जातीचे नाव काय? जिल्हा परिषदेच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत संतापजनक प्रश्न...

SCROLL FOR NEXT