photo
photo 
मराठवाडा

माजलगाव-नांदेड बस उलटली; प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा

वसमत(जि. हिंगोली): समोरून येणाऱ्या वाहनास साईड देण्याच्या प्रयत्‍नात माजलगाव- नांदेड बस उलटून दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.१४) तालुक्‍यातील तेलगाव पाटीजवळ घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, कल्याण ते निर्मल या राष्‍ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या रस्‍त्‍यावर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माजलगाव येथून नांदेडकडे जाणारी बस (एमएच २० बीएल ०६३८) नांदेडकडे जात होती. ही बस तेलगाव पाटीजवळ(ता. वसमत) येथे आली असता समोरून येणाऱ्या वाहनास साईड देण्याचा प्रयत्न करत होती. 

दहा प्रवाशांना किरकोळ जखमी


तेलगाव पाटी परिसरात महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे समोरील वाहनास साइड देण्याच्या प्रयत्‍नात बस रस्‍त्‍याच्या खाली उतरली. त्यानंतर बस उलटली. यावेळी बसच्या काचा फुटल्या असून बसमधील दहा प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांच्या पथकाने भेट दिली.

जखमींना उपचारासाठी हलविले


त्यानंतर पोलिस व इतर वाहनचालकांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने नांदेड, परभणीकडे उपचारासाठी रवाना केले. या वेळी काही काळ वाहतून विस्कळित झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या बसमध्ये २३ प्रवासी असल्याची माहिती मिळाली असून जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत. 

सूचना फलक बसविण्याची मागणी


वसमत येथून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. मात्र, महामार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता जागोजागी खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहने चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातून वाहने रस्त्याच्या खाली जात आहेत. महामार्गाचे काम गतीने करण्याची गरज आहे.  


कारच्या धडकेत एकाचा मृत्‍यू

आखाडा बाळापूर(जि. हिंगोली): एका भरधाव इंडिका कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. दहा) डोंगरकडा (ता. कळमनुरी) परिसरातील अश्वमेध ढाब्यासमोर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरकडा ते वारंगा मार्गावर असलेल्या अश्वमेध ढाब्यासमोर शुक्रवारी (ता. दहा) रात्री इंडिका कार (एमएच ३८, १५९९) चालकाने भरधाव वेगाने व हलगर्जीपणाने चालवून साहेबराव लोखंडे यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT