Osmanabad Accident News esakal
मराठवाडा

लग्नाचे स्वप्न रंगवणाऱ्या मुलावर काळाची झडप, मुलगी पाहून परताना झाला अपघात

मुलगी पाहून गावाकडे परतणाऱ्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा

दीपक बरकुल | सकाळ वृत्तसेवा

येरमाळा (जि.उस्मानाबाद) : मुलगी पाहून गावाकडे कारमधून परतणाऱ्या भूम (Bhoom) येथील कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून आईवडील गंभीर जखमी झाले आहेत. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वाशी (Vashi) तालुक्यातील तेरखेड्याजवळ उभ्या ट्रकला कारने टक्कर दिल्याने एक जण जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता.२२) पहाटे एकच्या सुमारास झाला. (Man Died In Accident In Vashi In Osmanabad)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार (एमएच १४ एफजी ८६७७) ही लातूरहून (Latur) भूमकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा येथे उभा असलेल्या ट्रकला (आरजे ११ जीबी ४९३७) मागून धडकल्याने कारमधील लातूर येथे मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या वसीम वाजीद शेख (रा.भूम) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे वडील वाजीद अब्दुल गफूर शेख (वय ५०) व आई मरीयम वाजीद शेख (वय ४५, रा.भूम) हे जखमी झाले आहेत.

जखमींना सोलापूर (Solapur) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद येरमाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.(Osmanabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT