Jalna News esakal
मराठवाडा

घनसावंगीत मासेमारी करण्यास गेलेला एक जण बुडाला पाण्यात

तलावात मासेमारी करणारा एक जण पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी घडली. दुसऱ्या दिवशी आज रविवारी त्याचा शोध लागला आहे.

सुभाष बिडे

घनसावंगी (जि.जालना) : देवीदहेगाव (ता.घनसावंगी) (Ghansawangi) येथील लघुसिंचन तलावात मासेमारी करणारा एक जण पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी (ता.१६) घडली. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.१७) त्याचा शोध लागला आहे. देवीदहेगाव लघुसिंचन तलावात मासेमारी करण्यासाठी सोमनाथ भिमराव ठाकरे (वय 45) हे शनिवारी (ता.१६) गेले असता पाण्यात बुडाले. स्थानिक (Jalna) नागरिकांनी शोध घेतला. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर पंचायत समिती सदस्य अनिरूध्द शिंदे यांनी पोलिस व महसूल प्रशानास कळविल्यानंतर रविवारी (ता.१७) परतूर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

तर कर्मचारी मोटारबोटीच्याद्वारे शोध घेत आहे. तरी दुसरा दिवस चोवीस तासापेक्षा जास्त काळ लागला तरी शोध लागला नाही. शेवटी चार वाजता मृतदेह बाहेर काढण्यात कर्मचार्‍यांना यश आले. दरम्यान घटनास्थळी नायब तहसीलदार संदीप मोरे, पोलिस उपनिरीक्षक श्री.टाकसाळ, मंडळ अधिकारी श्रीपाद देशपांडे, तलाठी एस.एस. बुचडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

Sangli Crime : जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी सांगलीत 20 वर्षांच्या तरुणाची निर्घृण हत्या; स्वामी समर्थ घाटावर चैतन्य तोरणेवर 8 ते 9 वर्मी घाव; संशयितांच्या घरावर दगडफेक

Latest Marathi News Update : पुण्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात

CBSE Three Language Policy: कोणतीही भाषा शिकणं वाया जात नाही, त्रिभाषा धोरणाला स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Jalgaon Rain Forecast : उत्तर महाराष्ट्रात मॉन्सून पुन्हा होणार सक्रिय! जळगाव जिल्ह्यात 'या' तारखेपासून वाढणार पावसाचा जोर? 35 ते 40 किमी वेगाने वाहणार वारे

SCROLL FOR NEXT