Vijay Prakash Kondekar eSakal
मराठवाडा

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

विजयप्रकाश हे महाराष्ट्र विद्युत मंडळात नोकरी करत होते. मात्र निवडणूक लढण्याच्या छंदासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Vijay Prakash Kondekar : आपल्या देशात अनेकांना निवडणुका लढवण्याचा मोठी आवड असते. किंवा एखादी तरी निवडणूक जिंकावी असं अनेकांना वाटतं. अनेक लोक यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र शक्यतो एकदा पराभव झाल्यावर कित्येक जण पुन्हा त्या फंदात पडत नाहीत. पण, लातूरमध्ये असा एक अवलिया आहे जो देशातील को-ऑपरेटिव्ह सोसायटीपासून ते अगदी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकाही लढवतो. विजयप्रकाश कोंडेकर असं या व्यक्तीचं नाव आहे. कोंडेकरांना ओळखत नाही असा लातूरकर निराळाच म्हणावा लागेल.

नोकरी सोडून लढवल्या निवडणुका

कोंडेकरांचं मूळ गाव हे लातूरमधील शिरूर. 1979 साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली, आणि तिथूनच त्यांचा हा प्रवास सुरू झाला. विजयप्रकाश हे महाराष्ट्र विद्युत मंडळात नोकरी करत होते. मात्र निवडणूक लढण्याच्या छंदासाठी त्यांनी आपली नोकरी देखील सोडली. आता ते अंगावर केवळ एक पंचा नेसून असतात.

अपक्षांचं सरकार आणायचंय

कोंडेकर यांना कुठल्याच राजकीय पक्षावर विश्वास नाही. आपल्या देशाच्या संसदेतील पक्षांची घाण बाजूला करून अपक्षांचं सरकार आणायचं आहे असं ते म्हणतात. लातूरमध्ये त्यांनी आतापर्यंत विलासराव देशमुख, शिवराज पाटील अशा दिग्गजांविरोधात निवडणूक लढवली आहे. यासोबतच शरद पवार, प्रिया दत्त, जया प्रदा यांच्याविरोधातही ते निवडणुकीत उतरले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी बारामती आणि पुणे या दोन मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे.

पुण्यात त्यांनी यापूर्वी देखील निवडणुका लढवल्या आहेत. कित्येकांनी त्यांना आपली स्टीलची गाडी ढकलत प्रचार करताना पाहिलं आहे. बूट हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे. 'बूट जिंकले पाहिजेत', 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान पदी बसू द्या' असं त्यांच्या प्रचार फलकावर लिहिलेलं दिसतं.

विजयप्रकाश यांची संपत्ती किती?

'सकाळ'शी गप्पा मारताना त्यांच्या संपत्तीबाबत विषय निघाला. यावेळी आपण आपल्या अर्जामध्ये तीन ट्रिलियन, सात लक्ष, 69 हजार 402 रुपये आणि 18 पैसे एवढी संपत्ती दाखवली असल्याचं ते म्हणाले. निवडणुक आयोगाच्या My Neta पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, विजयप्रकाश यांच्याकडे एकूण 14,84,903 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये बँकांमधील एफडी आणि 10 तोळे सोन्याचा समावेश आहे. अर्थात, हे सोनं त्यांच्या नावावर नसून, त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: वांद्रे टर्मिनसमध्ये मोठे अपडेट! तीन नवीन ट्रॅक बांधणार, लोकल ट्रेनची संख्या अन्...; नवे बदल कोणते?

Sahyadri Mountaineering: 'सह्याद्रीतील दुर्गम गूळाच्या ढेपा सुळक्यावर यशस्वी चढाई'; सुधागड तालुक्यातील गिर्यारोहकांची उल्लेखनीय कामगिरी!

IPL 2026 मधील हकालपट्टीनंतर Mustafizur Rahman च्या मदतीला धावला पाकिस्तान; कवडी भावात PSL मध्ये खेळणार

Mumbai BMC Election: 'शिवसेना भवन'ची धुरा मनसेच्या खांद्यावर, तर शिवाजी पार्क राखण्याचे उद्धव ठाकरेंपुढे आव्हान

संतापजनक प्रकार! कृष्णा नदीवरील बंधाऱ्याजवळ आढळला अर्धवट जळालेला मानवी पाय; सांगलीत उडाली खळबळ..

SCROLL FOR NEXT