Manjara Dam  esakal
मराठवाडा

Manjara Dam : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचे संकट; मांजरा धरणात २५ टक्के पाणीसाठा

निजामकालीन तालुका विकासामध्ये मागे!

सकाळ डिजिटल टीम

Manjara Dam : जिल्ह्यातील निजामकालीन १२२ गावांचा समावेश असलेल्या तालुक्याच्या केज शहरासह ग्रामीण भागाचा विकास इतर जुन्या तालुक्यांच्या तुलनेने फारच कमी झाला आहे. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरताना दिसून येत आहे. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने सिंचन व पिण्याच्या पाण्याची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणात केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणार असल्याची परिस्थिती आहे.

केज विधानसभा मतदार संघात केज, अंबाजोगाई व नेकनूर या शहरांचा समावेश आहे. मात्र, अंबाजोगाई शहराच्या तुलनेत केज शहर हे विकासापासून कोसो दूर आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्यातील मांजरा नदीच्या काठचा भाग हा सुपीक तर बालाघाटाच्या पर्वत रांगेच्या सानिध्यात येणारा भाग कायम पाण्याची टंचाई भासणारा आहे.

तालुक्याच्या एक लाख १४ हजार ८४६ हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळापैकी एक लाख ५ हजार ११२ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. तालुक्याच्या उत्तरेकडील टंचाईग्रस्त भागातील शेतकरी व शेतमजूर हे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सध्या मांजरा धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पन्नात घट होणार असून, उन्हाळ्यात पाणी टंचाई भेडसावण्याचे संकेत आहेत. तालुक्यात खामगाव-पंढरपूर व अहमदपूर-अहमदनगर सारख्या महामार्गाचे काम झाले असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या दळणवळणाची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील जनतेचे रस्ते, वीज व पाणी या मूलभूत प्रश्नांची अवस्था बिकट आहे.

विकासाचे प्रलंबित प्रश्न

तालुका क्रीडांगण, नगरपंचायत इमारत, लोकनेते गोपीनाथ मुंडे नाट्यगृह, बस आगार, विस्तारित नवीन वसाहत पाणीपुरवठा व व्यापारी संकुल या शहर विकासाच्या कामांसह मांजरा धरण परिसरातील जागतिक दर्जाचे जलपर्यटनस्थळ- मुकुंदराज उद्यान, तिर्थक्षेत्र विकास व ग्रामीण रस्ते या विकास कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT