Manoj Jarange Health Esakal
मराठवाडा

Manoj Jarange Health: मनोज जरांगेंना उपोषणामुळे अशक्तपणाचा त्रास, किडनीलाही सूज; कशी आहे त्यांची प्रकृती?

नऊ दिवस उपोषण केल्यानं मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे, त्यांचे १२ किलो वजन घटले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली होती, ते अशक्त झाले होते.उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. नऊ दिवस उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचे जवळपास १२ किलो वजन घटले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जरांगेंची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांची किडनी आणि लिव्हरला सूज आल्याचेही सांगितले. त्यांचे वजन १२ किलोंनी घटले आहे. काही दिवस त्यांनी पाणी न प्यायल्याने प्रकृती खालावली आहे, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सतत सुरू असलेले दौरे आणि उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. पुढील दहा दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

मनोज जरांगे हे उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असून, त्यांना आणखी १५ दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. सध्या जरांगे यांना शारीरिक हालचाल करण्यास मर्यादा आहेत. राज्यभरातील दौरे आणि उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी सप्टेंबरमध्ये जवळपास १७ दिवस उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची आंतरवाली सराटीमध्ये भेट घेऊन मुदत मागितली होती. त्यानंतर जरांगेंचे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभा झाल्या. सरकारला दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्यांदा उपोषणाला बसले. हे उपोषण जवळपास ९ दिवस सुरू होते. अखेर सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. ९ दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT