Manoj Jarange Esakal
मराठवाडा

Manoj Jarange : मनोज जरांगेंचे 2 सहकारी पोलिसांच्या ताब्यात; मुंबईला जाण्याच्या तयारीत असताना पहाटे ४ वाजता केली कारवाई

Manoj Jarange : मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच जालन्यात आज पहाटे सोमवारी (२६ फेब्रुवारी)अचानक पोलीस धडकले. त्यांनी जरांगे यांच्या दोन कट्टर समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी काल आंतरवाली सराटी येथे बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. फडणवीस माझ्याविरोधात कटकास्थान रचत असून मला सलाईमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. इतकंच नाही, तर मी मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाणार अशा इशाराही त्यांनी दिला आहे. ते काल सागर बंगल्याकडे रवाना झाले. मात्र, अशातच मनोज जरांगे यांच्या कट्टर समर्थकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्याआधीच जालन्यात आज पहाटे सोमवारी (२६ फेब्रुवारी)अचानक पोलीस धडकले. त्यांनी जरांगे यांच्या दोन कट्टर समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या दोन सहकाऱ्यांची नावे आहेत.

तीर्थपुरी गावातून शैलेंद्र पवार यांना तर अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी म्हणून ते सातत्याने त्यांच्या सोबत होते. रात्रीही भांबेरी गावात जरांगे पाटील यांच्या सोबत हे दोन्ही सहकारी होते. मात्र, मुंबईला जाण्यासाठी रात्री हे दोघं घरी गेले असताना त्यांना पहाटे चार वाजता पोलिसांनी तब्यात घेतलं आहे.

मात्र, पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जरांगे मुंबईत येण्याआधी सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT