Maratha Reservation esakal
मराठवाडा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या हालचालींना वेग; २१ सदस्यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे होणार रवाना?

मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ सरकारला भेटणार

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या अध्यादेशाचं स्वागत करत सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही सरकारच्या निर्णयावर दहा पावलं मागे यायला तयार आहोत. परंतु सरकारने आम्ही सूचवलेली दुरुस्ती केली पाहिजे. त्यांनी जीआर दुरुस्त करून आणला पाहिजे. तरच संपूर्ण न्याय झाला असं म्हणता येईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

त्याचबरोबर आमची सरसकट प्रमाणपत्राची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील, असा कडक इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घोषणा केली होती. काल (गुरुवारी) सरकारने यासंदर्भात शासन आदेश काढला आहे.

मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी निजामकालीन पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असं आश्वासन दिलं होतं. निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करुन कागदपत्रांची पडताळणी करण्यासंबंधीचा जीआर काढण्यात आलेला आहे.

तर आज मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून निरोप न आल्याने शिष्टमंडळ मुंबईला कधी जाणार हे मात्र अजूनही निश्चित नाही अशी माहिती समोर आली आहे. आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे 21 जणांचे शिष्ट मंडळ मुंबईला जाणार आहे.

या शिष्टमंडळामध्ये वकील, विचारवंत, समन्वयक असे तेरा आणि आठ गावकरी, शेतकरी यांचा समावेश असणार आहेत. या बैठकीमध्ये काही तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंबधीचे वृत्त टिव्ही ९ मराठीने दिले आहे.

सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हे शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे. गेल्या ११ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT