Manoj Jarange Esakal
मराठवाडा

Manoj Jarange: 'पावलो बाबा....', अजित पवार अन् फडणवीसांच्या जागी कार्तिकी पूजेची मागणी झाल्यावर जरांगेंची प्रतिक्रिया

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करण्याची मागणी झाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया

अंकिता खाणे (Ankita Khane)

कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे.

"मराठा समाजावर प्रेम असेल तर मनोज जरांगे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करावी. त्यानंतरही महापूजेसाठी येणार असाल तर मराठा समाज काय आहे, तुम्हाला माहिती आहे. बीड व जालना जिल्ह्यातील आमदारांचे काय काय झाले आहे. तुम्ही पाहिले असेल. तुम्हाला डेंगी झाला आहे. त्यामुळे पंढरपूरला येण्याचे धाडस करू नका. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरच काय राज्यात कुठेही फिरू देणार नाही", असा इशारा गायकवाड यांनी अजित पवार यांना उद्देशून दिला आहे.

तर कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो'.

'कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, मला बोलले हेच खूप झालं', असं जरांगे पाटील म्हणालेत. समाजाची भावना आणि देवस्थानाची भावना याचरणी मी नतमस्तक होतो. मला दर्शन झाल्यासारखं झालं आहे. मी आताच भरून पावलो असंही जरांगे पुढे म्हणालेत.

तर आग्रह जास्तच वाढला तर जाणार का? या पत्रकांराच्या प्रश्नावर जरांगे म्हणाले, मला आत्ताच पुजा झाल्यासारखं वाटलं, मला याचं समाधान वाटलं. ते म्हणाले तेच खूप झालं, आपल्याला तशी काही अपेक्षा नाही असंही जरांगे पुढे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT