file photo 
मराठवाडा

कोरोनाबाबत ‘या’ शहरात अनेकांना गांभीर्यच नाही... 

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचे संशयीत म्हणून आतापर्यंत नांदेडमध्ये सहा जणांवर उपचार करण्यात आले. सदरील सहा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. असे असले तरी, नांदेडमध्ये जिल्हा प्रशासनातर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे अजूनही अनेक नागरिकांनी कोरोनाबाबतचे गांभीर्य घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आला तर परिस्थिती बिकट बनू शकते. त्यासाठी नागरिकांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे.  

प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली तसेच शिकवणी वर्ग, अभ्यासिका, आठवडे बाजार, मॉल, मंगल कार्यालये, सिनेमागृहे, नाट्यगृहे, जलतरणिका आदी गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोना आजारावर उपचार नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही करण्यात येत आहे. 

अनेकजण अजूनही रस्त्यावर
एकीकडे प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी दुसरीकडे मात्र अनेकांनी कोरोनाच्या बाबतीत गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला असता अनेकजण कामाशिवाय बाहेर फिरताना दिसून येत आहेत. त्यात युवकांचा समावेश जास्त आहे. विशेष करुन सिग्नल आणि बाजारात सकाळी आणि संध्याकाळी अजूनही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना कोरोनाबाबत सांगून जनजागृतीची आवश्‍यकता आहे तसेच ऐकत नसतील तर कार्यवाही करण्याची गरज आहे.

नागरिकांकडून सहकार्याची गरज
कोरोनामुळे एकीकडे अनेक महत्वाचे कार्यक्रम, यात्रा, उत्सव, लग्न तसेच मोर्चे, आंदोलने रद्द करण्यात येत आहेत. अनावश्‍यक गर्दी टाळली तर निच्शितच कोरोनापासून बचाव होऊ शकतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्या ज्यांच्यासाठी लागू करण्यात येत आहेत त्या नागरिकांनी देखील अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाबाबत काही नागरिकांना अजूनही गांभीर्य नसल्याचे दिसून येत असून जनजागृतीची गरज आहे. व्यापारी, दुकानदारांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्‍यक बाबींसाठीच घराबाहेर पडावे, अन्यथा घरातच थांबावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केल्या असून आता त्याचे पालन करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. 
 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

Matcha Drink : इन्स्टाग्रामपासून घराघरांत पोहोचले माचा! ‘हिरव्या माचा’ची देशभरात क्रेझ; गुगल सर्चमध्ये १३०० टक्क्यांची वाढ

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

SCROLL FOR NEXT