mukrmabad.jpg 
मराठवाडा

खरेदीच्या कारणावरून अनेकजण घराबाहेर

विनोद आपटे


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड) ः नांदेड येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यातील यंत्रणा पुरती हादरली असून रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी प्रशासन कामाला लागले असून नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत असतानाही मुक्रमाबाद येथील नागरिकांना मात्र या परिस्थितीचे थोडेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळातही येथील नागरिक तोंडावर मास्क न घालता व सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसऊन बिनधास्त रस्त्यावर फिरताना दिसत असून अशा नागरिकांना समजाऊन सांगण्यातच येथील पोलिस प्रशासनाचा दिवस जात असल्यामुळे नागरिक मस्त, तर पोलिस प्रशासन त्रस्त, अशीच गत झालेली आहे.

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाची झोप उडाली असून लॉकडाउन व संचारबंदीत नागरिकांनी घराच्या बाहेर न पडण्याबद्दल वारंवार विनंती व आवाहन करूनही नागरिक नियम मोडीत काढत औषधी, किराणा, भाजी, पाला, दूध यासह इतर जीवनाश्यक वस्तूंची खरेदी, वैद्यकीय उपचारासाठी, नागरिक चारचाकी, दुचाकी व पायी बिनधास्तपणे मुक्रमाबाद शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.

कार्यकर्त्यांचा फोन पोलिस प्रशासनाला
तर या नागरिकांच्या तोंडावर मास्क घातले जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचे कुठेच काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही. नागरिक शहरासह परिसरातील गावामध्ये बिनधास्त फिरत असल्यामुळे कोरोनाचा अधिक धोका बळावला असून मोकाट फिरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून पोलिस प्रशासन अशा लोकांवर कारवाईचा बडगा उपसला असताना मात्र शहर व परिसरातील राजकीय पुढाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा फोन पोलिस प्रशासनाला जात असल्यामुळे पोलिस यंत्रणेवर दबाव आणला जात आहे.

शासनाने घालून दिलेले नियम पायदळी
मुक्रमाबाद येथील शुक्रवारचा आठवडे बाजार पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला असतानाही परिसरातून शहरात नागरिकांचे टोळकेच्या टोळके दाखल झाले हाते. ६० वर्षांचे श्रावण बाळ, जनधन खात्यात जमा झालेले पैसे उचलण्यासाठी बँकेत, तर किराणा, औषधी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असूनही गर्दी पाहाता शासनाने घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : अपहरण करून खून केल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT