Many major roads in Hingoli city have been encroached by many traders.jpg 
मराठवाडा

शहरातील अतिक्रमण धारकांची धावपळ

राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सदर अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार १२ फेब्रुवारीला नगर परिषदतर्फे धडक मोहीम राबवून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होताच अतिक्रमण धारकांची धावपळ सुरू झाली.

हिंगोली शहरातील नवीन रस्ते अरूंद झाले असले तरी प्रमुख रस्त्यांसह इतर ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने पुन्हा हे रस्ते वाहतुकीकरीता अडचणकारक ठरत होते. दिवसेंदिवस रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात येत असल्याने मध्यंतरी नगर परिषदेच्यावतीने ध्वनीक्षेपकाद्वारे ज्या-ज्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अशांनी तत्काळ काढून घ्यावे अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानुसार काही व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण हटविले. परंतु बहुतांशी व्यापाऱ्यांनी अतिक्रमण हटविले नसल्याने १२ फेब्रुवारीपासून सलग दोन दिवस ही मोहीम राबविण्यात आली. यात अग्रसेन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, देवडानगर ते आझम काँलनी, गांधी चौकात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. 

यावेळी मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, शाम माळवटकर, बाळू बांगर, देवीसिंग ठाकूर आदींच्या पथकाने ही मोहीम राबविली आहे. काही जणांचे अतिक्रमण जेसीबीच्या माध्यमातून हटविण्यात आले. तर काही जणांनी अतिक्रमण काढणे सुरू केल्याने शहरात अतिक्रमण धारकांची धावपळ सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime : अटक वॉरंट चावून खाण्याचा प्रयत्न, चिमुकल्याला टेबलावर आपटण्याची धमकी! म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताच्या पत्नीचा धिंगाणा

Dhurandhar Bade Sahab : धुरंधर चित्रपटातील 'बडे साहब' कोण? आदित्य धर स्वतःच म्हणाले ती व्यक्ती म्हणजे...

Latest Marathi News Live Update: पेणमधील स्ट्राँगरूममध्ये उंदरांचा शिरकाव, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर सवाल

Nashik Leopard : गडकरी चौकात बिबट्याचे दर्शन होऊन २४ तास उलटले; भरवस्तीतून बिबट्या गेला कुठे? नाशिकमध्ये भीतीचे वातावरण

Budha Gochar 2025: 'या' राशीच्या लोकांचा 20 डिसेंबरपासून बदलेले लक, बिझनेसमध्ये नफा अन् प्रमोशनचे जुळून येतील योग

SCROLL FOR NEXT