Maratha Kranti Morcha Gives A Deadline To The Government 
मराठवाडा

#MarathaKrantiMorcha मराठा क्रांती मोर्चाची शासनाला डेडलाईन

सकाळवृत्तसेवा

बीड/परळी : मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, शासनाची होऊ घातलेली मेगा भरती थांबवावी यासाठी मराठा क्रांती मोर्चाने शासनाला ता. 7 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. अन्यथा 9 ऑगस्ट पासून राज्यभर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही करण्यात आली.

परळी येथे ता. 18 जुलै पासून सुरु झालेले ठिय्या आंदोलन गुरुवारी (ता. 2) सोळाव्या दिवशीही सुरुच आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यातील 26 जिल्ह्यांच्या समन्वयकांनी परळीत हजेरी लावली. यानंतर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आंदोलनातील महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मराठा आंदोलने व समाजाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती बरखास्त करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्या मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय घ्यावा तसेच मंत्रीमंडळाच्या ठरावासोबत निर्णय परळी येथील आंदोलनस्थळी दिला तरच परळीतील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येईल, असेही समन्वयकांच्या बैठकीत ठरले. दरम्यान, चोरांबा (ता. धारुर) येथे रास्ता रोको आंदोलन झाले. तर, माजलगाव येथील ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरुच होते. दरम्यान, परळीत मोर्चा समन्वयकांनी बैठीनंतर मदयमांना ही माहिती दिली.

यावेळी आबासाहेब पाटील, अमित घाडगे, सुनील नागणे, विवेकानंद बाबर, आप्पासाहेब कुठेकर, रमेश केरे पाटील, शाम पाटील, सुभाष जावळे, कल्याणी पाटील, गोरख शिंदे, राम मस्के, ज्ञानेश्वर कवडे, अर्जुन साळुंखे, महेश डोंगरे, हनुमंत पाटील, सचिन पाटील, नानासाहेब जावळे, संजय सावंत, अशोक हिंगे, बापू शिरसाठ, विशाल कदम, बळीराम पाटील, राज पाटील संदीप पाटील, राजन मोरे, भानुदास जाधव, ज्योती सपाटे, बबन सुद्रीक उपस्थित होते. 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT