Jalna news.jpg
Jalna news.jpg 
मराठवाडा

VIDEO : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर 'थाळीनाद' आंदोलन

उमेश वाघमारे

जालना : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर शुक्रवारी (ता.दोन) थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी एक मराठा, लाख मराठा आशा  घोषणाही देण्यात आल्या.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राज्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

जालना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन करून ठिय्या मांडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आला.


ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण देऊ नये, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्यावी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठेपर्यंत राज्य शासनाने कोणत्याही विभागातील नोकरभरती प्रक्रिया करू नये,  मराठा क्रांती मोर्चातील समन्वयक आणि तरुणांवरील राज्यातील सर्व गुन्हे मागे घ्यावे, २०१९ मध्ये एमपीएससीमध्ये  निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करावी,  सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजासाठी १२ टक्के जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी.

 राज्यपालामार्फत राष्ट्रपतींकडे एसईसीबी प्रवर्ग १०२ घटना दुरुस्तीनुसार नोटीफायर करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा. ओबीसीचा कोटा वाढवून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश कारावा, सारथीच्या संस्थेच्या अध्यक्षपदी छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करून १०० कोटीचा निधी द्यावा, मराठा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी, आदी मागण्यासाठी हे आंदोनल करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT