vinayakrao patil  sakal
मराठवाडा

Maratha Reservation : पोलीस प्रशासनाने विनायकराव पाटील यांना जीवंत समाधी घेण्यापासून रोखले ! मनोज जरांगे पाटील यांनी साधला दुरध्वनीवरून संवाद

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी

अविनाश काळे,

उमरगा - मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केल्याची खंत मनात धरून समाजसेवक विनायकराव पाटील यांनी जीवंत समाधी घेतली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांची दुरध्वनीद्वारे मध्यस्थी केल्याने पोलीस प्रशासनाने श्री. पाटील यांना जीवंत समाधी घेण्यापासून रोखले.

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण उपोषणाला पाठींबा देण्यासाठी श्री. पाटील यांनी  कवठा ग्रामस्थांच्या वतीने २५ ऑक्टोबर पासून अमरण उपोषण सुरू केले होते. उपोषण कालावधी दरम्यान श्री. पाटील  मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाल्यास तीन नोव्हेंबरला जीवंत समाधी घेण्याचा निर्धार केला होता. सलग सात दिवस अमरण उपोषण केल्यामुळे पाटील यांची प्रकृती खालावली होती. जीवंत समाधी घेण्याच्या निर्धारावर पाटील ठाम असल्याने समाधी घेण्याची तयार पूर्ण झाली होती.

शुक्रवारी ठरल्याप्रमाणे उपोषणस्थळी कवठा व परिसरातील हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात श्री. पाटील समाधी स्थळावर जाऊन समाधिष्ठ झाले. या वेळी प्रशासनाची व उपस्थित ग्रामस्थांची एकच धांदल उडाली होती, या वेळी श्री. जरांगे यांनी श्री. पाटील यांच्याशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, नायब तहसीलदार रतन काजळे, पोलीस निरीक्षक डि. बी. पारेकर, शितल पाटील, शहाजी पाटील, विजयकुमार सोनवणे आदि सह ग्रामस्थांनी व महिलांनी विनवणी करून, मध्यस्थी करून श्री. पाटील यांना समाधी घेण्यापासून थांबविले.

उपोषण कालावधि दरम्यान श्री. पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर लातूर येथील डॉ. राठोड यांच्या रुग्णालयात वैद्यकिय उपचार सुरु करण्यात आले आहेत. आगामी काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा कायम रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात समाजाच्या विविध प्रश्नाबाबत लढा सुरुच रहाणार असल्याचे सांगुन श्री. पाटील यांनी बालकांच्या हस्ते पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.

विकास पाटील, मलंग गुरुजी, व्यकंटराव सोनवणे, नितीन पाटील, अलका माने, शोभा सोनवणे, अक्षरबाई सोनवणे, शशिकला पाटील यांच्यासह  कवठा ग्रामस्थ, भजनी मंडळाच्या महिला मोठ्या संख्यने उपस्थि होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT