Dr. Sanjay Lakhe sakal
मराठवाडा

Maratha Reservation : ‘त्या’ मसुद्याने सर्वच आरक्षणाचे वाटोळे - डॉ. संजय लाखे

‘मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने २४ जानेवारीला मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर काढलेल्या मसुद्याने मराठा आरक्षणासह इतर समाजाच्या आरक्षणाचेही वाटोळे होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

जालना - ‘मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने २४ जानेवारीला मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर काढलेल्या मसुद्याने मराठा आरक्षणासह इतर समाजाच्या आरक्षणाचेही वाटोळे होणार आहे. त्यामुळे या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करण्याची मागणी चुकीची आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे म्हणाले.

पत्रकार परिषदेत शनिवारी बोलताना ते म्हणाले की, या मसुद्यातील सजातीय विवाह आणि गृहचौकशी या बाबी वगळाव्यात, यासाठी रविवारी (ता. ११) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे.

डॉ. लाखे म्हणाले, ‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी सगेसोयरे शब्द असला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती.

त्यानुसार राज्य शासनाने मसुद्यात सगेसोयरे शब्द टाकला. मात्र, त्याच वेळी ‘पितृसत्ता’ असा शब्द प्रयोग करून सगेसोयरे या शब्दाला काहीच महत्त्व ठेवले नाही.’ मसुद्याचे कायद्यात रूपांतर झाले तर ओबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती यांना जात पडताळणीप्रसंगी सजातीय विवाहाचा पुरावा द्यावा लागेल.

या मसुद्याचे कायद्यात रूपांतर झाले तर मराठा आरक्षणासह इतर समाजाच्या आरक्षणाचेही वाटोळे होणार आहे’, असे डॉ. लाखे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT