Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: 'हॅलो...तुमचा चेक परत आला!' मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुबेर कुटुंबियांची बँकेमुळे तारांबळ

सरकारकडून १० लाखांची मदत; पण, दिलेले चेक झाले बाउन्स

सकाळ वृत्तसेवा

‘‘हॅलो... मी बँकेतून बोलतोय. तुम्ही टाकलेला धनादेश (चेक) परत आला आहे’’, असा फोन मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आपतगावाच्या गणेश कुबेर यांच्या कुटुंबीयांना आला. यामुळे आधीच दु:खात असलेल्या कुटुंबीयांना सरकारने जाहीर केलेली मदत खोटी होती की काय, असे वाटले. त्यांनी थेट बीड बायपासवरील त्या बँकेची शाखा गाठली. विचारणा केली, तेव्हा बँकेने शासनाकडून मिळालेल्या दहा लाख रुपयांच्या चेकवरील स्वाक्षरी जुळत नसल्याचे सांगत तो कुबेर कुटुंबीयांना परत केला. दरम्यान, प्रशासनाने पुढाकार घेत ही रक्कम कुबेर यांच्या खात्यात आरटीजीएस केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणात बँकेच्या बेफिकिरीमुळे कुबेर कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला.

मराठा आरक्षणासाठी आपतगाव (ता.छत्रपती संभाजीनगर) येथील २८ वर्षीय गणेश कुबेर यांनी आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका, असा संदेश गणेशने लिहिला होता. त्यांच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने २८ ऑक्टोबरला त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर केली होती. तथापि, बँकेतून फोन तसा आल्यामुळे कुटुंबीयांना चेक बाऊन्स झाल्याचे वाटले.

आम्हाला मनस्ताप

गणेश कुबेरचा भाऊ भरत म्हणाला, की आम्ही ३० ऑक्टोबरला मदतीचा दहा लाखांचा धनादेश हा बीड बायपास रोडवरील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत जमा केला. ३१ ऑक्टोबरला दुपारी बॅंकेतून फोन आला. ‘तुमचा चेक परत आला’, असे सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही बँकेत गेल्यानंतर चौकशी केली तेव्हा त्यांनी तहसीलदारांची स्वाक्षरी न जुळल्याने हा चेक परत आल्याचे सांगत तो आमच्याकडे सुपूर्द केला. तो चेक घेऊन आम्ही शुक्रवारी (ता.३) जिल्हाधिकारी प्रशासनाची भेट घेतली.

याविषयी विचारणा केल्यानंतर गुरुवारीच तुमच्या खात्यावर दहा लाख रुपये आरटीजीएस केले असल्याचे प्रशासनाने सांगितले. एवढेच नव्हे, तर बँकेलाही फोन करून आरटीजीएस केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही बँकेत गेल्यानंतर खाते चेक केले असता पैसे जमा झालेले होते. हा सर्व गोंधळ बँकेमुळेच झाला. त्यातून आम्हाला मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे भरत कुबरे यांनी सांगितले.

सरकारने केलेल्या मदतीचा ‘चेक बाऊन्स’ होत नसतो!

उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे म्हणाले, की सरकारने कोणालाही केलेल्या मदतीचा धनादेश (चेक) बाऊन्स होत नसतो. आपतगाव व कोलठाण येथील आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यावर मदतीची रक्कम आरटीजीएस करण्यात आलेली आहे. चेक बाऊन्स झाला नाही, तांत्रिक अडचण झाली. बाकी शासकीय मदत त्यांना देण्यात आली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांतर्फे बँकेलाही कळविले होते.

कुबेर कुटुंबीय व गाडेकर कुटुंबीयांना धनादेश देण्यात आले. मात्र, ते का वटले नाहीत? आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांची अशा प्रकारची थट्टा करणे चुकीचे आहे. यासंदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी; मग तो अधिकारी बँकेचा असो वा महसूलचा.

- अभिजित देशमुख, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

SCROLL FOR NEXT