Maratha Reservation
Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलनाचा मुद्दा आता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. आधी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये बस फोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.

यापार्श्वभूमीवर बीडमध्ये संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी तात्काळ संचारबंदीची घोषणा केली आहे. दीपा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सोशल मिडियामुळे आंदोलन आणकी पेटू नये यासाठी बीडमध्ये १ नोव्हेंबर पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

बीडनंतर आता धाराशिवमध्ये संचारबंदी

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला धाराशिव जिल्ह्यात हिंसक वळण लागलं आहे. एसटी बसेसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या गाडीवर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होऊन खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नुकतेच त्यांनी आदेश जारी केले आहे.

राज्यभरात मध्यरात्रीपासून या मराठा आरक्षणासाठी करण्यात येत असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. एसटी बसेस तसेच शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांना आग लावण्याचे, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले करण्याचे प्रकार घडले. काही ठिकाणी कार्यालयांवर दगडफेक करून आग लावण्याचे प्रकार घडले. फोटोंना काळे फासण्यात आले, शासकीय आणि खासगी कार्यालयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: "हाती आलेले निकाल हे..." बारामतीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

Lok Sabha Election Result 2024 : सर्व्हे चुकीचा ठरतोय दिसताच अॅक्सिस माय इंडियाच्या प्रमुखाला कोसळलं रडू

Beed Constituency Lok Sabha Election Result: बीडमध्ये फिरली बजरंगाची गदा! पंकजा मुडेंचा चुरशीच्या लढतीत पराभव

Odisha Assembly Election : भाजपचा २५ वर्षांपासून एकतर्फी सत्ता गाजवणाऱ्या BJDला धोबीपछाड! ८० जागा जिंकत मिळवलं स्पष्ट बहुमत

SCROLL FOR NEXT