maratha reservation maratha reservation
मराठवाडा

मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाभर बैठका

मराठा समाजातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी व नाकर्ते सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे

सकाळ वृत्तसेवा

बीड: मराठा समाजाचे आरक्षण (maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर सरकारकडून समाजाला त्यांच्या अधिकारातल्या कुठल्याही सवलती दिल्या जात नाही. या विरोधात बीडमध्ये शनिवारी (ता. पाच) मराठा क्रांती संघर्ष मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी मागील काही दिवसांपासून शहरात आणि जिल्हाभरात विविध ठिकाणी पूर्वतयारीच्या बैठकाही होत आहेत. कोरोना असो की लॉकडाऊन, पाच जूनचा मोर्चा निघणारच असा निर्धार मोर्चासाठी पुढाकार घेतलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा या नावाने शनिवारी सकाळी ११ वाजता श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून मोर्चा निघणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. दरम्यान, नियोजित मोर्चाच्या अनुषंगाने आमदार विनायक मेटे पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातील विविध भागांत बैठका घेत आहेत. बीड शहरातील विविध भागांसह नेकनुर, चौसाळा, लिंबागणेश, राजुरी, नाळवंडी सर्कलमध्येही बैठका झाल्या. तर, गेवराई, माजलगाव परळी व अंबाजोगाई या तालुक्यांच्या ठिकाणीही बैठका घेण्यात आल्या.

मराठा समाजातील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी व नाकर्ते सरकारला जाग आणण्यासाठी हा मोर्चा असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झालाय. हा आक्रोश पाच जून रोजी च्या बीड येथील मोर्चातून दिसून येईल, असे विनायक मेटे म्हणाले. मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या मागण्या सरकारसमोर मांडण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Wedding : क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील खेडेगावात, सेलिब्रिटींची उपस्थिती; पोलिसांचा बंदोबस्त, कसं असेल नियोजन

Pankaja Munde PA case: पंकजा मुंडेंचे PA यांच्या पत्नीचा रहस्यमय मृत्यू; कुटुंबाचा हत्येचा आरोप… नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: : सेव्हनहिल उड्डाणपुलावर भीषण अपघात: अचानक ब्रेकचा बळी ठरला ५ वर्षीय चिमुकला

CM Yogi Adityanath: योगींनी प्रयागराजमध्ये केले गंगा पूजन व हनुमानजींचे दर्शन; माघ मेळ्यासाठी मागितला आशीर्वाद

Hinjewadi Accident : मारुंजी अपघात; मिक्सर चालकासह प्लँट मालकालाही अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT