Maratha reservation Esakal
मराठवाडा

Maratha reservation: 'मला बोलता येतयं तोपर्यंत चर्चेला या...', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तर आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांचा हात थरथरत होता. बोलताना मनोज जरांगे यांच्या हातातून माईक खाली पडला. तर यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारशी कोणताही संवाद झालेला नाही, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळालेली नाहीत. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असं तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे यांनी म्हटलं आहे.

तर मिडियाच्या कॅमऱ्यासमोर चर्चा होत नसते, समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “ त्यांच्या कानात बोळे घातले आहे का? मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाही. पण फक्त एकदाच चर्चा होणार. जोपर्यंत मला बोलता येत आहे, तोपर्यंत चर्चेसाठी यायले पाहिजे. त्यानंतर येऊन काही फायदा नाही. चर्चेसाठी या आमचे मराठे तुम्हाला कुठेच अडवणार नाही. आरक्षण द्यायचे की नाही एकदाच येऊन सांगायचे, बाकीची वळवळ करायची नाही, ' असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

तुम्ही उपोषण करताय त्याचा अर्ज द्या.. परवानगी घ्या.. म्हणजे तुम्ही आमरण उपोषण तातडीने सुरू केलंय हे सरकारला कळू द्या. आपण आरक्षण घेऊ. कोणीही आत्महत्या करू नका. शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. आपली एकजूट फुटू देऊ नका. आपण आरक्षण मिळवणारच. फक्त एकजूट राहा, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT