maratha reservation sakal
मराठवाडा

Maratha Reservation : साखळी उपोषणास बसलेल्या व्यक्तीचे हृदयविकाराने निधन सिंदगी येथील घटना

नुकताच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सिंदगी गावांमध्ये साखळी उपोषण

सय्यद अतिक

हिंगोली - येथे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषणामध्ये बसलेल्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाल्याची घटना शनिवारी ता.चार घडली आहे.

याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सिंदगी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या व मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत सिंदगी या गावांमध्ये मागच्या काही दिवसापासून साखळी उपोषण सुरु आहे.

नुकताच मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतरही सिंदगी गावांमध्ये साखळी उपोषण सुरूच आहे , साखळी उपोषण मध्ये शनिवार गावातील प्रकाश नामदेव मगर वय ६० वर्ष हे देखील उपोषणास बसले होते संध्याकाळी च्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने

त्यांना जवळच असलेल्या पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले असता डॉ. मदन गारोळे यांनी प्राथमिक उपचार करून ताबडतोब त्यांना हिंगोली येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले असता हिंगोली येथील रुग्णालयातील डॉक्टरनी मृत्यू झाला असल्याचे सागितले .

प्रकाश नामदेव मगर उपोषणाला सिदगी गाव मध्ये बसले असता त्यांचा हृदयविकाराचा झटके येऊन निधन झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मनमिळाव स्वभावाचे असलेले प्रकाश मगर यांच्या निधनाने सिदगी गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी अलर्ट! आता 'इथून' ट्रेनमध्ये चढलात तर गुन्हा दाखल होणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! 'त्या' नागरिकांना परदेशी घोषित करण्याच्या आदेशाला स्थगिती

Jejuri Wari Accident: 'पंढरीच्या वाटेवर होतो, अन् मागून ट्रक आला अन्..' जखमी वारकरी महिलेने सांगितला थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयाने अंकित शर्मा यांची हत्या आणि दंगल यांसारख्या गुन्ह्यांसाठी ताहिर हुसेनला दोषी ठरवले

Snake Bite : कोळवण येथे सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मित्र व घरातील नातेवाईकांच्या तत्परतेने वाचला जीव; कोळवण येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र होणे गरजेचे

SCROLL FOR NEXT