Maratha Reservation 
मराठवाडा

Maratha Reservation : जरांगे पाटलांबद्दल टिप्पणी; अजित पवार गटाच्या आमदाराची गाडी जाळली, बंगल्यावर दगडफेक

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली

पांडुरंग उगले, कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. हजारो नागरिकांचा मॉब त्यांच्या बंगल्यात घुसला असून दगडफेक, वाहनांची जाळपोळ, बंगल्याची तोडफोड करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ३०) ही घटना घडली.

मराठा समाजाला आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटी यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सुरुवातीला जिल्ह्यात साखळी उपोषणे झाली. मात्र, मागच्या दोन दिवसांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बसची जाळपोळ, अचानक रास्ता रोको, असे प्रकार होत आहेत.

त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हिनवणी करणाऱ्या वक्तव्याची कथीत ऑडीओ क्लीप समोर आली. यावरुन मराठा आंदोलक आक्रमक झाले.

Maratha Reservation
Maratha Reservation
Maratha Reservation

सोवमारी त्यांच्या माजलगावच्या बंगल्यासमोर हजारोंची गर्दी जमली. सुरुवातीला बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. यात बंगल्याच्या सगळ्या काचा फुटल्या. त्यानंतर आंदोलकांनी गेट उघडून आतमध्ये घुसून चारचाकी वाहनांना आग लावली. आगीनंतर बंगल्यातून ज्वाला आणि धुरांचे लोट बाहेर निघत होते. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी आलेल्या अग्नीशमन वाहनाचीही आंदोलकांनी तोडफोड केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, घरच्यांचा लग्नाला कडाडून विरोध; नैराश्यातून तरुणानं रेल्वेखाली उडी घेत संपवलं जीवन

Kolhapur Crime : लगोरीने काच फोडून मोटारीतील ऐवज पळविला,कोल्हापुरातील प्रकार; चोरीची रक्कम पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Latest Marathi News Live Update : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन

Gautam Gambhir Angry: तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत, २३ वर्षाच्या पोराला...! गंभीर भडकला; म्हणाला, त्याचा बाप माजी चेअरमन नाही, म्हणून...

Hemorrhoid Risk : बाथरूममध्ये मोबाईल वापरताय? फक्त आजार नाही...तर मोठ्या रोगाकडे घेऊन जातीये 'ही' सवय, संशोधनातून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT