Vinod Gaikwad
Vinod Gaikwad Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सरमकुंडी येथे विनोद गायकवाड यांनी जीवन संपविले

नेताजी नलवडे

वाशी - सरमकुंडी, ता. वाशी येथील विनोद उर्फ बंडू ञिंबक गायकवाड (वय-४० वर्ष) यांनी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार (ता. १७) रोजी सकाळी ११ वाजनेच्या सुमारास उघडकीस आली आहे. त्यांच्याजवळ मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी पोलीसांना सापडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानतंर संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सरमकुंडी येथील ४० वर्षीय विनोद उर्फ बंडू ञिंबक गायकवाड हे मराठा आरक्षणाचा लढा सुरु झाल्यापासुन या लढ्यात सक्रीय सहभागी होते. विविध ठिकाणी चर्चा करत असताना कायम ते मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भुमिका मांडत असत.

माञ अद्यापर्यतही आरक्षण मिळालेले नसल्याने ते व्यथीत होते. आत्महत्येपुर्वी त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे. मी माझ्या मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देत नाही म्हणुन मी आता आंदोलन करुन कंठाळलो आहे. त्यामुळे मी मरुन जात आहे. त्यामुळे मी फाशी घेतली.

विनोद गायकवाड यांना गुरुवारी संध्याकाळी सहा ते सात वाजनेच्या सुमारास नागरिकांनी गावात पाहीले होते. माञ यानतंर ते कोणासही दिसले नाहीत. राञभर ते घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता, सरमकुंडी तांदुळवाडी रस्त्यावर असलेल्या स्वतच्या शेतात सर्व्हे नबंर ७३ मधील आंब्याच्या झाडाला पांढ-या उपरण्याच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी व पाच वर्षाची एक मुलगी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक एस. डी. दसुरकर यांनी घटनास्थळी सहका-यासह दाखल होऊन घटनेचा पंचनामा करुन मृहदेह वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानतंर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आरक्षणासाठी शासन किती बळी घेणार नागरिकांची चर्चा

दोन दिवसापुर्वीच बुधवारी शहरात मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांची भव्य सभा झाली. या सभेला विनोद गायकवाड उपस्थीत होते. सभेत बोलताना जरांगे-पाटील यांनी आपणाला आरक्षण मिळणारच असल्याचे सांगुण आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करु नये असे आवाहन केले होते. माञ सभेच्या दुस-याच दिवशी तालुक्यात आरक्षणासाठी आत्महत्येची घटना घडल्याने संपुर्ण तालुक्यावर शौककळा पसरली असुन, आरक्षणासाठी शासन आणखी किती बळी घेणार अशी चर्चा ग्रामीण रुग्णालय परिसरात व शहरातील नागरिकांमध्ये ऐकवायास मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT