Maratha Reservation Esakal
मराठवाडा

Maratha Reservation: ब्रेकफेल झालेला पिकअप कोणाचा? मनोज जरांगेंचा रोख कोणाकडे

Manoj Jarange: साल्हेर किल्लाजवळ घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता मला चांगलंच माहिती आहे, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काल (मंगळवारी २० फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावलं. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, दुसरीकडे सरकारने आमची फसवणूक केली असून आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण हवंय, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.

आज मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत बैठक घेतली. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, जे आम्हाला नको आहे, ते आरक्षण सरकार आम्हाला देत आहे. मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे. तर सरकारला सरसकट आरक्षण देण्यात काय अडचण आहे? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे, तर त्यांनी सरसरट मराठ्यांना आरक्षण द्यावं या आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत, सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही जरांगे यांनी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना जरांगे यांनी साल्हेर किल्लाजवळ ताफ्यात ब्रेक फेल झालेले पिकअपसारखे वाहन घालून घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला, यावरून गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी केले आहेत. त्या घातपातासाठी कार्यकर्ता कोणी पाठवला होता ते मला माहिती आहे, गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे, सखोल चौकशी होईल ती चौकशी लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळ येईल असंही यावेळी जरांगे म्हणालेत. तर नाव न घेता त्यांनी यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

साल्हेरला कोण आलं होतं, घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला होता, मला चांगलंच माहिती आहे, ते वाहन कसं घुसलं ते माहितीये, असं जरांगे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT