Murder Sakal
मराठवाडा

विजेचा शॉक देऊन सूनेचा केला होता खून; सासरच्या तिघांना जन्मठेप

बेडरुम मधील टेबल फॅनच्या कनेक्शन मधील विजेच्या शॉकने सुजाताचा मृत्यू झाल्याची बतावणी सासरच्या मंडळींनी केली होती.

अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शेतीची वाटणी आणि विभक्त रहाण्याची मागणी करीत असल्याच्या कारणावरून सासरच्या पाच जणांनी संगनमत करुन विवाहित महिलेचा विजेचा शॉक देऊन खुन केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता. चार) बेळंब (ता.उमरगा) येथील पती, सासरा आणि दिर या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Marathawada Crime News)

याबाबतची माहिती अशी की, बेळंब येथे बंदिछोडे कुटुंबातील सुजाता म्हाळाप्पा बंदिछोडे हि पती व सासरच्या मंडळींना कुटुंबातुन विभक्त (वेगळे रहाण्यासाठी) करून देण्याची आणि शेतीच्या वाटणीची मागणी करीत असे. घर फोडण्यासाठी सुरू असलेल्या मागणीमुळे पती म्हाळाप्पा, सासरा बाबु, दिर दगडू, सासू नागरबाई आणि जाऊ भागिरथी दगडू बंदिछोडे यांनी संगनमत करून सुजाताचा २८ मार्च २०१२ रोजी रात्री बेडरुममध्ये विजेचा शॉक देऊन खुन केला होता. मात्र बेडरुम मधील टेबल फॅनच्या कनेक्शन मधील विजेच्या शॉकने सुजाताचा मृत्यू झाल्याची बतावणी सासरच्या मंडळींनी केली होती.

परंतू शरिरावरील गळा, मान आणि हातावरील जखमांमुळे संशय व्यक्त करुन वडिल सुरेश लक्ष्मण कागे (रा. आष्टा कासार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरुम पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणाविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर फिर्यादी सुरेश कागे यांचा मृत्यु झाला. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान नऊ जणांची साक्ष घेण्यात आली. मयत सुजाताची आई मंगलबाई, भाऊ सतीश कागे, अनुजा बंदिछोडे, मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालिन वैद्यकिय अधिकारी डॉ. ए.एम. गवळी, नंदकुमार चुंगे, तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी ए.ए. निंगदळे यांची या प्रकरणी साक्ष महत्वाची ठरली.

"टेबल फॅनच्या कनेक्शन मधील विजेच्या शॉकने सुजाताचा मृत्यू झालेला नाही, यासंदर्भात वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष आणि शवविच्छेदनाचा अहवाल हा आरोपींना शिक्षा देण्यास पुरक आहे" असा युक्तिवाद सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. संदिप देशपांडे यांनी केला. हा युक्तिवाद आणि न्यायालयासमोर आलेले पुरावे, साक्ष गृहीत धरून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश डी.के. अनभुले यांनी पती म्हाळाप्पा, सासरा बाबु आणि दिर दगडू यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी भूमकर यांनी कोर्ट पैरवी केली. दरम्यान न्यायालयाने सासू नागरबाई, जाऊ भागिरथी यांची पुराव्याअभावी निर्दोष मूक्तता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT