Mother-&-Father
Mother-&-Father 
मराठवाडा

व्याकूळ मायबाप हे कुणाचे पाप?

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सगळीकडूनच आमची कोंडी होतेय. घुसमटल्यासारखे जिणे जगतोय. आतापर्यंत सर्व काही सहन केले, यापुढे नाही. आता एकत्र येणार आणि हक्कांसाठी लढणार, असा निर्धार ज्येष्ठ नागरिकांनी केला. 

आयुष्यभर कामे करून सेवा केली. आता उतारवयात गरज आहे ती आधाराची. पण घरच्यांकडून दुर्लक्ष होते आणि समाजाकडूनही अवहेलना होत आहे.

मायबाप म्हणविल्या जाणाऱ्या सरकारने तर वाऱ्यावरच सोडलेले आहे. मुलाबाळांसाठी खस्ता खाल्ल्या. आता तेच विचारत नाहीत. सरकारी नोकरीत हयात घालविली, आता पेन्शन मिळते पाचशे-हजार रुपये! खासगी नोकरी करून रिटायर्ड झालेल्यांचे हाल तर पाहवले जात नाहीत. ‘अडगळीतले’ म्हणून समाजही दूर लोटतोय...

या प्रातिनिधिक समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या. ‘सकाळ’ने घेतलेल्या बैठकीत ज्येष्ठांनी पोटतिडकीने समस्या मांडल्या. 

आम्ही कुणाकडे भीक मागत नाही, हक्कच मागतोय. तोही जर देणार नसाल तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकत्र येऊ आणि संघटित लढा देऊ, असा निर्वाणीचा इशाराही ज्येष्ठ नागरिकांनी या बैठकीत सरकारला दिला. आमदार-खासदारांना सत्तर-ऐंशी हजार रुपये पेन्शन मिळते, मग आम्हाला पुरेशी पेन्शन का नाही? गरज सरो अन्‌ वैद्य मरो, अशीच आमची गत सरकारसह सर्वांनीच करून ठेवली आहे. पण आता संयम संपला. आम्ही आता हक्कांसाठी तीव्र संघर्ष करू, असा निर्धारही ज्येष्ठ नागरिकांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT