latur  sakal
मराठवाडा

Marathwada Accident News : सहा कि.मी.च्या चौपदरीकरणात चार पुलांचा धोका; दीड वर्षानंतर पुलांच्या कामासाठी जाग

दीड वर्षापू्र्वी रस्त्याचे विमानतळ चौक ते मुरूड अकोलादरम्यान सहा किलोमीटर अंतरात चौपदीकरण करण्यात आले.

विकास गाढवे

लातूर - लातूर ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या मागणीला जोर चढला असतानाच या रस्त्याचे सहा किलोमीटरदरम्यान झालेले चौपदीकरण प्रवाशांसाठी शाप ठरत आहे. चौपदीकरणात चार पुलांची कामे तशीच राहिली आहे. दीड वर्षानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुलांच्या कामासाठी जाग आली आहे. पुलांच्या कामांचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवला आहे. अर्धवट पुलामुळे धोका वाढला आहे. अरूंद पुलाचा अंदाज न आलेली वाहने वेगाने येऊन थेट पुलावरून खाली पडत आहेत. विभागाने पुलांची सूचना देण्यासाठी बुजगवण्यासारख्या उभारलेल्या फलकांचा रंग उडाल्याने अपघाताची संख्या वाढत आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक वर्षापासून रखडलेल्या लातूर ते टेंभूर्णी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाला मान्यता देण्यात आली. यातच दीड वर्षापू्र्वी रस्त्याचे विमानतळ चौक ते मुरूड अकोलादरम्यान सहा किलोमीटर अंतरात चौपदीकरण करण्यात आले. त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तीस कोटी रूपये उधळले. या कामात अनेक ठिकाणी दोष असून पहिल्याच पावसानंतर पडलेले खड्डे आता सिमेंट क्रॉंक्रीटने बुजवले जात आहेत.

चौपदरीकरण करताना सहा किलोमीटरच्या अंतरातील चार पुलांच्या कामांचा समावेश करण्यात आला नाही. यामुळे पुलांच्या कामाशिवाय झालेले हे काम आता धोकादायक ठरत आहे. पुल अरूंद व रस्ता चौपदीकरणामुळे रूंद झाल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांना जवळ येईपर्यंत पुलाचा अंदाज येत नाही. यामुळे नियंत्रण सुटून वाहने पुलात जाऊन पडत आहेत. काही महिन्यात मोठ्या संख्येने अशा अपघात झाले आहे. या अपघाताकडे दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू व जखमीची संख्या वाढत आहे.

अपघात टाळण्यासाठी महामार्ग विभागाने पुलाच्या दूर अंतरावर मुरूमाच्या ढिगाऱ्याचा टेकू देऊन काही सूचना फलक उभारले आहेत. बुजगवण्यासारख्या या फलकांवरील सूचनांचा रंग दोनच महिन्यात गेला आहे. यामुळे पुन्हा अपघात वाढले आहे. चौपदीकरणाआधी मुरूडहून येणारे वाहनचालक खड्ड्यांमुळे त्रस्त होतात. चौपदीकरणावर येताच ते वाहनांचा वेग वाढवतात व पुलाचा अंदाज न आल्याने अपघात होतात. अनेक दुचाकी व चारचाकींनी पुलावरून खाली उड्या मारल्या आहेत. यामुळेच पुलाची माहिती असणाऱ्या प्रवाशांना सहा किलोमीटरचे हे चौपदरीकरण वरदान तर माहिती नसलेल्यांना शापच ठरत आहे.

पुलाचा प्रस्तावावर मुंबईत धूळ

अनेक अपघातांतून धडा घेऊन सहा किलोमीटरच्या चौपदीकरणात चार पुलांचे रुंदीकरणाचे काम चालू वर्षाच्या आराखड्यात मंजूर असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली. या कामाचे अंदाजपत्रक विभागाच्या येथील कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या मुख्य अभियंत्यांकडे पाठवले आहे.

२८ जूनपासून चार कोटी ३३ लाख रूपये खर्चाचे अंदाजपत्रक नवी मुंबई कार्यालयात धुळ खात पडले आहे. मागील साडेतीन महिन्यापासून या कामाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेची प्रतीक्षा विभागाला आहे. यामुळे पुलांच्या कामाला मंजूरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किती अपघात होतील असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT