Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates 
मराठवाडा

Corona : मराठवाड्यात ३७ रुग्णांचा मृत्यू, ५२३ जण कोरोनाबाधित

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद जिल्ह्यात ९४ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ७४ जण आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यात Marathwada सोमवारी (ता. १४) दिवसभरात ५२३ जण कोरोनाबाधित Corona आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड Beed १५४, उस्मानाबाद Osmanabad १०८, लातूर Latur १०४, औरंगाबाद Aurangabad ९४, परभणी Parbhani ३०, जालना Jalna १७, नांदेड Nanded १२, हिंगोली Hingoli ४. मराठवाड्यात रविवारी (ता. १३) ३९७ बाधित आढळले होते. उपचारादरम्यान आणखी ३७ जणांचा मृत्यू झाला. त्यात बीड-लातुरमध्ये प्रत्येकी १०, औरंगाबाद ७, हिंगोली ४, जालना-नांदेडमध्ये प्रत्येकी दोन, परभणी-उस्मानाबादेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. रविवारी २९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती.Marathwada Corona Updates Covid 523 New Cases Reported

औरंगाबादेत ९४ बाधित

औरंगाबाद जिल्ह्यात ९४ कोरोनाबाधित आढळले. त्यात शहरातील २०, ग्रामीण भागातील ७४ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४४ हजार ७८८ वर पोचली आहे. आणखी २२३ रुग्ण बरे झाले. त्यात शहरातील १४ तर ग्रामीण भागातील २०९ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ८४६ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ५९३ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी सात जणांचा मृत्यू झाला. चारनेर (ता. सिल्लोड) येथील पुरुष (वय ४२), तलवाडा (ता. वैजापूर) येथील महिला (७०), कोरहाळा तांडा केळगाव (ता. सिल्लोड) येथील पुरुष (७४), गावठाण शेवगाव (जि. औरंगाबाद) येथील महिला (६१) कन्नड येथील पुरुष (५०), लासूरगाव (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा (८२) घाटी रुग्णालयात तर सिडको एन-दोन भागातील पुरुष (५९), सराफा रोड भागातील पुरुषाचा (७१) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३४९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT