Corona 
मराठवाडा

Corona Updates : मराठवाड्यात २८६ जण कोरोनाबाधित, चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) शनिवारी (ता. सात) २८६ कोरोनाबाधितांची (Corona) भर पडली तर दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यात केवळ सात रुग्ण आढळले. या तीन जिल्ह्यांसह औरंगाबाद (Aurangabad) व जालना (Jalna) जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, बीड जिल्ह्यात १५१ नवीन रुग्ण तर दोन मृत्यू आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात ७२ रुग्ण आणि एका मृत्यूची नोंद झाली. या दोन जिल्ह्यांची रुग्णसंख्या २२३ आहे. नांदेड जिल्ह्यात केवळ दोन कोरोनाबाधित आढळले. सध्या ४० रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी चार कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. परभणी (Parbhani) जिल्ह्यात दोन रुग्णांची नोंद झाली.

सध्या १९ जण उपचार घेत आहेत. दिवसभरात सहा रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. हिंगोली जिल्ह्यात तीन रुग्ण आढळून आले. दिवसभरात दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जालन्यात २२ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दिवसभरात मृत्यूची नोंद झाली नाही. दरम्यान, २३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. लातूर जिल्ह्यात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

औरंगाबाद शहरात दोन रुग्ण

औरंगाबाद जिल्ह्यात १८ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यात शहरातील दोन व ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५९९ झाली. आजपर्यंत एकूण ३ हजार ५११ जणांचा मृत्यू झाला. शनिवारी ४३ रुग्णांना सुटी झाली. यात शहरातील सात व ग्रामीण भागातील ३६ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४३ हजार ८१३ रुग्णांना सुटी झाली. सध्या एकूण २७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी दिवसभरात मृत्यूची नोंद झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT