Vijayadashami Dasara 2022 esakal
मराठवाडा

Marathwada : दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बाजारपेठ सज्ज

जालनात नवरात्रोत्सवाची धार्मिक कार्यक्रमांनी सांगता

सकाळ वृत्तसेवा

जालना : विजयादशमी अर्थात दसऱ्याचा पूर्ण मुहूर्त साधण्यासाठी नववस्तू, सोने,चांदी आणि कपडे खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. दुसरीकडे नवरात्रोत्सवाची विविध धार्मिक कार्यक्रमांनी सांगता दिसून येत आहे. दुर्गा देवीची पूजा नवमीची विशेष पूजा,कुलाचार करण्यात भाविक व्यस्त दिसून येत आहे. बुधवारी (ता.५ ) विजयादशमी, धम्म चक्र प्रवर्तन दिन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

शहर व जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देवी आणि बालाजी मंदिरात मंगळवारी ( ता.४) नवमीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांत भाविकांची मोठी गर्दी दिसून आली आहे. शहरातील दुर्गा देवी,मंमादेवी,काळुंका माता,तुळजाभवानी मंदिरात महिलांची गर्दी दिसून आली. नवमीच्या दिवशी कुलधर्म ,कुलाचारासह धार्मिक कार्यक्रमाचा घरोघरी उत्साह दिसून आला. दुसरीकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यासाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.

शहरातील कपडा बाजार,सराफा बाजार आणि दुचाकी,चारचाकी वाहन खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. शहरातील शिवाजी महाराज पुतळा परिसर,गांधी चमन,शनिमंदिर, सतकर कॉम्प्लेक्स परिसरात दुकानावर नागरिकांची वस्तु खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. बाजारपेठेत कापड दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. महिला साड्यांसह लहान मुलांचे रेडिमेड कपडे खरेदी करण्यात नागरिक पसंती देत आहे.

झेंडू फुलांचा बाजार

शहरातील गांधी चमन, शनिमंदिर, अंबड चौफुली,भोकरदन नाका परिसर,मस्तगड परिसर, शिवाजी महाराज पुतळा परिसरात खेड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आणले आहेत.शहरात ठिकठिकाणी झेंडू फुले,ऊस आणि आपट्याची पानेही विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

खरेदीला पसंती

शहरातील बाजारपेठेत नागरिक वॉशींग मशीन,फ्रीज, मायक्रोव्हेव, ज्युसर, मोबाईल, संगणक, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यासारख्या वस्तु खरेदीचा कल दिसून येत आहे.

चारचाकी वाहनांसाठी वेटिंग

शहरात दुचाकी गाडी खरेदीकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.दुसरीकडे गेल्या दोन महिन्यांपासून ब्रेझा सह इतर कंपनीच्या चारचाकी गाडी बुकिंग करण्यात आले आहे. परंतु दसऱ्याला अनेकांना गाडी मिळणार नसल्याचे दुकानचालकांनी सांगितले. दोन महिन्यांपासून आम्ही चारचाकी गाडी बुक केली आहे,परंतु अजूनही गाडी मिळाली नसल्याचे ग्राहक अरुणकुमार लांडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: सचिन जाधवर मृत्यू प्रकरणात पोलिस तपासावर संशय; वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनाफोनी कशासाठी?

Hapus Mango : पुण्यात हापूस दाखल! पेटीला १५ हजार; केशरचीही पहिली आवक

Sahar Sheikh: ‘मी घाबरणार नाही’; आरोपांवर AIMIM नगरसेविका सहर शेख यांचे ठाम उत्तर, नवीन वक्तव्य चर्चेत? म्हणाल्या...

T20 World Cup 2026 Update: बांगलादेश पाठोपाठ आता पाकिस्तानही ‘टी- 20’ विश्वचषकात नाही खेळणार?

Mohol News : अठरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT