मराठवाडा

बंधाऱ्यामुळे उजाडली सिंधीकामठला आर्थिक पहाट

सकाळवृत्तसेवा

बोरोळ - सिंधीकामठ (ता. देवणी) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याने दुर्गम व दुर्लक्षित झालेल्या सिंधीकामठ गावाचे अर्थकारण बदलले असून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे.

सिंधीकामठ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शेवटचे गाव. मांजरा नदीकाठ असला तरी बारमाही पाणीप्रश्न कायमच भेडसावणारा. दळणवळणाच्या सुविधांचा अभाव, रस्त्याचा गंभीर प्रश्न, शैक्षणिक मागासलेपण यामुळे गावाचा विकास खुंटलेला. तालुक्‍यातील अन्य भाग विकसित झाला तरी मांजरा नदीकाठच्या दुर्गम भागातील सिंधीकामठ मात्र विकासापासून व भौतिक सुविधांपासून दूर. सिंधीकामठ गावाचे दक्षिणेस असलेल्या मांजरा नदी हीच महाराष्ट्र कर्नाटक राज्याची भौगोलिक सीमा. राज्य शासनाने पुढाकार घेत सिंधीकामठ येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्याचे नियोजन केले. मात्र त्यासाठी कर्नाटक राज्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी येथील स्थानिक नेत्यांना कानडी भाषेशी जुळवणी करीत थेट बेंगळुरु गाठावे लागले. कर्नाटक शासनाने ना हरकत दिल्यानंतर पूर्ण खर्च महाराष्ट्र शासनाने करीत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला. प्रकल्पामुळे दोन्ही राज्याला एक करणारा पूल तयार होऊन या भागातून कर्नाटकात जाण्यासाठी जवळचा व सोयीचा रस्ता उपलब्ध झाला आहे. गेल्या काही वर्षापासून कर्नाटक शासनाने भालकी ते देवणी बस दिवसभर सुरू ठेवल्याने सिंधीकामठ गाव मुख्य रस्त्यावर आले आहे.

पायाभूत सुविधांचा अभाव, त्यातून गावातील नागरिकांचे शहराकडे झालेले स्थलांतर रोखण्यास हा प्रकल्प कारणीभूत ठरला असून येथे सिंचनाच्या सुविधांमुळे शेतीमध्ये बारमाही पिके फुलू लागली आहेत. येथील युवक शहराकडे न जाता शेतीतच विविध प्रयोग करीत उत्पादन वाढवत आहेत. 

शिवाय नदीकाठच्या दोन्ही राज्यांतील नागरिकांना मासेमारी करता येत असल्यामुळे उत्पन्नाचे मोठे साधन उपलब्ध झाले आहे. तालुक्‍यातील बोरोळ, सिंधीकामठ, बटनपूर, लासोना भागातील शेतीला लाभ होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT