crime in jalna
crime in jalna esakal
मराठवाडा

Marathwada : युवा किराणा व्यापाऱ्यावर गावठी पिस्तूलने झाडली गोळी

सकाळ वृत्तसेवा

कुंभार पिंपळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलनातील गाळा क्रमांक दहा मधील आनंद किराणा दुकानाचे मालक आदेश पांडुरंग चांडक (वय 27) या युवक व्यापाऱ्यावर गुरुवारी (ता.27) रात्री आठ वाजेच्या दरम्यान अज्ञात युवकाने गावठी पिस्तूल मधून गोळी झाडली यात गोळी चुकवत असताना डावा हात पुढे केल्याने हाताला गोळी लागून आदेश चांडक जखमी झाले त्यांना जालनाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असुन याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा एकजणाला ताब्यात घेतले आहे.

चांडक यांचे किराणा दुकान आहे रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानावर सामान घेण्याच्या बहाण्याने एक युवक आला तर त्याचा दुसरा साथीदार रस्त्यावर उभा राहिला. चांडक यांना त्याने पैशाची मागणी केली, चांडक यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने लगेच त्याच्या जवळच्या गावठी पिस्तूलने चांडक यांच्यावर गोळी झाडली मात्र चांडक यांनी गोळी चुकवत डावा हात पुढे केल्याने त्यांच्या हातावर गोळी लागून गंभीर दुखापत झाली.

रक्तबंबाळ अवस्थेत ते खाली बसले, दुकानातही रक्त पडले.दरम्यान गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे व्यापारी,ग्रामस्थ जमा झाले तोपर्यंत गोळी झाडणार्‍या सहित अन्य एक जण दुचाकीवरून फरार झाले. जखमी युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नंतर जालन्याला हलवण्यात आले असून त्याची प्रकृती बरी आहे.

दरम्यान पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फौजफाट्यासह परिसर पिंजून काढला.दरम्यान तासाभरातच विरेगव्हाण तांड्याजवळ एका संशयिताला ताब्यात घेतले असून काही वस्तुही मिळाल्या आहेत.

रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास सुरू होता. दरम्यान या घटनेने व्यापारात भीती व्यक्त होत असून रात्री उशिरापर्यंत दुकानापुढे मोठी गर्दी झाली होती.रात्री जालन्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT