Gajanan Misal World Record 
मराठवाडा

मराठवाड्याच्या सुपुत्राचा विश्‍वविक्रम, गजानन मिसाळ यांच्या अनोख्या बाईक रायडिंगची लिम्का बुकमध्ये नोंद

उमेश वाघमारे

जालना : जालना जिल्ह्याच्या पुत्राने बाईक रायडिंगचा नवा विश्‍वविक्रम स्वतःच्या नावावर कोरला असून जालन्याचे नाव उंचावले आहे. भारतीय लष्करातील लान्स नायक पदावर कार्यरत असलेल्या गजानन मिसाळ यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ग्राऊंडवर बुलेटच्या ब्रेक लाईटवर बसून १११ किलोमीटर दुचाकी चालविण्याचा विश्‍वविक्रम केला आहे. हा विश्‍वविक्रम दोन तास २७ मिनिट ५४ सेंकदामध्ये त्यांनी पूर्ण केला आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील गजानन बबनराव मिसाळ हे २०१२ मध्ये लष्करामध्ये (आर्मीमध्ये) रूजू झाले होते.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची ता.२५ सप्टेंबर २०१२ मध्ये लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीममध्ये निवड झाली. या टीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना दुचाकीचे संपूर्ण ज्ञान देण्यात आले. तसेच त्यांनी सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षणही पूर्ण केले. त्यानंतर २०१६ व २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच २०१६ च्या लष्कराच्या परेडमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.


दरम्यान डेअर डेव्हिल्स टीमच्या नावाने आतापर्यंत २८ विश्‍व रेकॉर्ड आहेत. २०१८ मध्ये ग्राऊंडवर सराव करत असताना बुलटेच्या ब्रेक लाईटवर (टेल लाईट) बसून दुचाकी चालविण्याचा लान्स नायक गजानन मिसाळ यांनी पहिला प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी ब्रेक लाईटवर बसून बुलेट चालविण्याचा सरावाला सुरवात केली आणि ते त्यात पारंगत झाले.

नुकत्‍याच पार पडलेल्‍या १९७१ च्या विजय दिनानिमित्त मध्य प्रदेशातील जबलपूर येथील सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या गौरीशंकर परेड ग्राऊंडवर सहा कॅमेऱ्यांच्या नजरेत बुलेटच्या ब्रेक लाइटवर बसून तब्बल १११ किमी अंतर दुचाकी चालविण्याचा विश्‍वविक्रम केला आहे. यासाठी त्यांना दोन तास २७ मिनिट ५४ सेकंदांचा कालावधी लागला आहे. लान्स नायक गजानन मिसाळ यांनी केलेल्या या विश्‍व विक्रमाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जालन्याच्या भूमिपूत्राच्या या विश्‍वविक्रमामुळे जालन्याच्या मानात अजून एक तुरा रोवला गेला आहे.

लष्कारामध्ये दाखल झाल्यानंतर टीव्हीवर प्रजाकसत्ताक दिनाची परेड पाहत असताना आपण ही या परेडमध्ये सहभागी होण्याची स्वप्न पाहिले. त्यानुसार सराव करून ता. २५ सप्टेंबर २०१२ मध्ये लष्कराच्या सिग्नल ट्रेनिंग सेंटरच्या डेअर डेव्हिल्स या टीम निवड झाली. त्यानंतर २०१६ व २०१९ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या राजपथवरील परेडमध्ये सहभाग घेतला. बुलेटच्या ब्रेक लाईटवर बसून दुचाकी चालविण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरल्याने सराव करून आज हा विश्‍व विक्रम केला आहे. डेअर डेव्हिल्स टीमच्या नावे हा २९ वा विश्‍व विक्रम आपल्या नावे झाल्याने खूप आनंद आहे.
- गजानन मिसाळ, लान्स नायक, डेअर डेव्हिल्स टीम सदस्य, जबलपूर.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT